________________
प्रसंग सत्तेचाळीसावा : ६४९
ते पाहोनिया पार्थिवान । धनुष्य टणत्कारिले तेन । अरेरे हा पंडुनंदन | अभिधान धनंजय ॥ १४५ ।। अर्जुन म्हणती या देहासी । आता सावध व्हा मानसी । टणत्कारिले धनुष्यासी । त्या नादासी ते सर्व भ्याले ।। १४६ ॥ द्रौपद वोळखी अर्जुन । राजे शांत केले तयान । सैवर मंडपरितीन | लग्नविधीन पाच रोज || १४७ ।। हे उभयता रत्नप्राप्त | पुण्यावाचोनी कैस होत । गेला नरदेह नाही येत । जिनभाषित पुण्याविना ॥ १४८ ॥ सातवा तो कूर्म दृष्टान्त । श्रोता श्रवनी एकचित्त । स्वयंभूरमण अब्धीत । लक्ष कासव वर्क्स भ्रमित || १४९ || तयाचे चर्म सूक्ष्म फार । सूर्या न दिसे अणुमात्र । काळे करोनी कर्मयंत्र | सूर्यनेत्र अवलोकील ।। १५० ॥ स्वस्वकुटुंबही पाहील । पुनः दिनकरही देखेल । गेल्या नरदेह न येईल । जीवा सांभाळिल पाहिजे ।। १५१।। भव्यै जानोनिया हितासी । पहा सिद्धान्त शास्त्रास | कुशास्त्र सुशास्त्र भेदासी । सुदेव कुदेवासी वोळखा ।। १५२ ।। सुगुरू कुगुरूचे भेद | सुबुद्धीन पाहावे सुध । कुबुधी वळखा विविध । सुधासुध आत्मप्रचीत ।। १५३ ।। सुधासुध दोन अक्षर । अनंत भेद याचे फार ।
सुपुण्यकुपुण्य अंतर | पंडित चतुर वोळखावे ।। १५४ ।।
सुबुधीन सुखच प्राप्त । कुबुधीन दुःख अनंत ।
चौन्यांशी लक्ष योनि भ्रमत । तुर्य गति मिथ्यात दुःखी ।। १५५ ।।
म्हणोन पंडित चतुर । सुपुण्य करा तिळभर ।
जेने जन्म पुन: नर सुर । द्वी कुगती दूर जीवाच्या ।। १५६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org