________________
६४८ । आराधना कथाकोष
चक्राचक्रासहस्र आरा । आराद्वारा बहुतछिद्रा | भ्रमण जैप्य पळा त्वरा । सुभटद्वारा रक्षिताती ॥१३३॥ स्तंभा स्तंभा उपरि राधा । अलंकारे शोभति मूर्ध्ना । षोडशाभरण विविधा | मुक्ताफळ सुधा नासिकी ॥ १३४ ॥ द्रौपदपुत्री रूपवंती | द्रौपदी बाळा गुणवंती | सैवर मंडप पृथ्वीपति । राजे येताती क्षितिधर ।। १३५ ॥ मंडप दिधला विस्तीर्ण । पृथवीराजे जैसे भान । करिनीवरी बाळा बैसोन । उभी येवोन राधा यंत्री ॥ १३६ ॥ करी पुष्प माळा सुवासे । सुगंध चाले दशदिसे । जेवि ते इंद्रकन्या भासे । गगनी दिसे चंद्रकळा ||१३७ || की विद्युल्लता मेघमाळी । की शेषकन्या सुकुमाळी | की मुक्तकांति मुक्ताफळी । चांफेकळी पीतवर्णं ।। १३८ ।। राधायंत्र पाहोनी राय । पुण्यविना साध्य न होय । पूर्वदत्त पुण्याशिवाय । स्त्रीरत्न होय केवि प्राप्त ।। १३९ ।। श्लोक- पूर्वदत्ते या विद्या पूर्व दत्तेसु या स्त्रिया | पूर्वं दत्तेसु यत् धनं अग्रे धावति धावति ॥ १४० ॥ दुर्लभ नरदेह जाला प्राप्त । तुर्यदान पुण्यशास्त्रयुक्त । यापरी सुपुण्य पूर्वदत्त । तरी प्राप्त स्त्रीधनविद्या ॥ १४१ ॥ धनुर्विद्या पूर्वपुण्यान | राशयंत्र भेदल त्यान । दुर्लभ जीवा पुरूषरत्न । पूर्वदत्त पुण्य द्रौपदीचे ॥ १४२ ॥ अर्जुन गळा माळा घाली । जयजयकार केला सकळी । क्रोधे तप्त जाले ते बळी | कोन हा अकुळी कापडी ||१४३ ॥ राजे उठले महावीर । रण चत्वारी जे झुंझार । टाक देई अमची नार । नग्न शस्त्र बाण लाविती ॥ १४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org