________________
प्रसंग सत्तेचाळीसावा : ६४७ तो जाला राजा ग्रामभूप । चक्रवर्ती सेना अनूप । स्त्रिया गुणी सुंदर रूप । अळिंकारस्वरूप शोभा पै ।।१२२॥ तो बैसलासे सिंहासनी । दास वारिती चौरिपानी। कुंडल झळकती द्वैकर्णी । हेमधूम्रपाणि झर्झरी ।।१२३॥ नेक उपचार सभेस । मध्याह्न होता भोजनास । स्नान मर्दन दासीदास । चंदन सुवास पुष्पादी ।।१२४॥ भोजनी षड्रसपक्वान्न । स्त्रिया वाढती विनोदान । एक पदार्थ लवणाविन । क्रोध उत्पन्न जाला त्यासी ॥१२५॥ एक स्त्रिया होती सेजारी । पाल्लवी धरी झटका मारी । तव त्याची आस्त्री मंजूरी । जागृत अंतरी भयभीत ॥१२६।। काहितो झोपित जागृत । उठोनी चालला सभेत । बैसला सिंहासनावरूत । तव तो जागृत जाहला ॥१२७||.. कैची सभा कैच तेज । दिनोदयी उठवी भाज । जाई अति ते मोळिवोझ । दुर्लभराज्य पुण्यविना ।।१२८॥ तथा नष्टं मनुष्यजन्म । पुनः न ये जीवा उत्तम । जनभाषित धर्मकाम । उत्तमोत्तम ज्ञाते हो करा ॥१२९॥
॥ इति स्वप्न दृष्टान्त ६ ॥ श्लोक-वक्षेहं चक्रदृष्टान्तं स्तंभाद्वाविंशतिर्दू ढाः । स्तंभे स्तंभे भवत्चके चक्रे चक्रे बुधैर्मतं ।।१३०॥ सुदर्शन मेरुदक्षिणे । वेशात काकिंदी पत्तने । राजा द्रौपद कुळी भान । धर्म जैन क्रियावंत ।।१३१॥ तत् ग्रामासमीप बागात । द्वाविंशाति ते स्तंभ त्यात । स्तंभे स्तंभे चक्रे वरौत । चक्रे बुधीवंत तिष्ठताती ॥१३२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org