________________
६५० : आराधना कंथाकोष
ऐसी तीर्थंकराची वानी । सम्मेदशिखर पुराणी ।
शिखर यात्रा करी प्राणी । चुकली दोनी नरक तिर्यंच ।। १५७ ।। ऐसे तीर्थंकर बोलले । ते चंद्रहृदयी धरले ।
I
त्याहाचे वचन सांभाळिले । कवित्व केले लघुचंद्र ।। १५८ ।। श्लोक- शृण्वन्तु युगदृष्टान्तं सज्जना चारुचेतसः । प्रमाणं योजनाना हि लक्षद्वयसमायते' ।। १५९ ।।
।
|
योग दृष्टान्त तो आठवा । किंचित् सज्जनी परिसावा | जावया मोक्षाचिया गावा । पुण्यठेवा करावा बुधै ।। १६० ।। क्षार समुद्राच प्रमाण | दोन लक्ष असे योजन । लंबायमान तो संपूर्ण । टाकिती दोन काष्ठ त्यात ।।१६१।। ते काष्ठ भ्रमत भ्रमत । योगायोगि फिरता त्यात । न मिळेचि एक एकात । फेरे फिरत बहुकाळ ।। १६२ ।। असो तेही कालांतरे मिळती जुग्म बरोबर | नरदेहे न ये त्वर । बुधिवंत समग्र जानावे ।। १६३ ।। जानोनी करावा सुधर्म । कुधर्म द्यावा तो टाकून । सर्वाभूती दया करण | पुण्यांचरण नरदेही ।। १६४ ॥ नरदेह सर्वात श्रेष्ठ । दुर्लभ जैन धर्म गरीष्ठ । • क्रिया आचार तोही सुभट । मार्ग नीट गति पाचवी ।। १६५ ।। याच अर्थी दृष्टान्त एक । किंचित् ऐकावा भाविक । कथानुसंधान कौतुक | जिननायक साहाकारी ।। १६६ ।। नौवा दृष्टान्त अल्पमती । प्रमाण सांगे योमकीर्ती । पूर्वाचार्याधारे मती । रत्नकीर्तीचे प्रसादे पै ।।१६७॥
१. लांबी.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org