________________
६४४ । आराधना कथाकोष
वीराआंगी महास्फुरण । करी शस्त्र दिसती नग्न । हस्त घोडे रथ पायदळान । चतुरंग सैन्यसिंधु तो ।।८८।। गडगडीत मदहस्ति । अश्वही सारे चमकत । रथी वीर बाणभाती । पायदळ घेती दारुयंत्र ।। ८९।। अयोध्या नगरीत आनंदे । देवपूजा वाद्य सुवाद्ये । पंडित पढति मंत्र शुद्ध । जय जय शब्द यशस्वी ।।९।। पूजा संपूर्ण विधियुक्त । श्रीपूज्यपूजा यथाशक्त । गुरू आशीर्वाद जयवंत । भोजनी तृप्त तुर्यसंघ ।।११।। मग पाचारोनी सैन्यक । सैन्य मेळा वाद्ये अनेक । गज रथ तुरंग पाईक । रत्नभेरी धाक वैरिया ॥९२।। रत्नखांब रणांगनी । पूजा केली सैनिकानी । रणवाद्ये एकच ध्वनी । वैरी दणाणी अंतरी ॥९३॥ जितशत्रु कोधि आनीळ । अयोध्यापती शांतिजळ । क्रोधाग्नी वैरी तो निर्बळ । करिता बळ यश न ये ।।९४।। दोष पश्चात्ताप करून । वैर सांडिला शास्त्रयुक्तीन । आर्जव धर्म तिसरा गुण । कोन्हासी भांडण करू नये ।।९५॥ दोघा समता भाव जाला । जिनधर्म महोत्सव केला । आदराप्रती आदर भला । मार्गस्थ केला क्षमाभावे ।।९६।। तदा तस्मिन् प्रजा सर्वे । निजं धान्यं मागति सर्वे । राजा दयावंत अपूर्वे । शास्त्र सर्वे ज्ञानसागर ॥९७॥ ज्याचे त्यासी दिधल धान्य । किंचित् जिनधर्मपुण्य । सिद्धान्तधर्मी नृप धन्य । अदत्ता धान्य न घेचि ॥९८।। जे जे गेले ते होय प्राप्त । पुण्य करा जिनभाषित । हेही घडेल अवचित । नरदेह जीवात दुर्लभ ॥१९॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org