________________
प्रसंग सत्तेचाळीसावा । ६४३ श्लोकः-धान्यदृष्टान्तकं वक्षे संक्षेपेण सतां हितं । जंबूद्वीप प्रमाणाच योजनैकसहस्रतः ।।७६।। तृतीय धान्याचा दृष्टान्त । कवि सांगतु सकळित । जंबूद्वीप प्रमाणयुक्त । सहस्रशतयोजन पै ॥७७॥ एक योजन खोलीगार । रोम टुकडे गच्ची फार । नित्य एकखंड काढिता बाहिर । रीतीगार योजन एक ।।७८।। योजनाचे काय प्रमाण । सहस्र कोस चाले विमान । षड्मास रात्रंदिन । एक योजन इंद्राचे पै ।।७९।। हेही काळयोग होईल । नरदेह गेल्या न येइल । जरी जीव पुण्य करील । जिनेंद्र भासिले किचित् ।।८।। याच अर्थी धान्य दृष्टान्त । विनीता देश अयोध्येत । राजा प्रजापाळ पुण्यवंत । राजनीत व्रत आचरी ।।८१॥ त्याचा शत्रु राजगृहात । जितशत्रु हा बळवंत । अयोध्यापत्तन घेउ पहात । निघाला त्वरित सैन्येसी ।।८२।। ते ऐकोनिया प्रजापाळ । जमा केला सैन्य मेळ । प्रजा पाचारिली सकळ । धान्य समूळ एकत्र ठेवा ॥८३।। राजदुर्गात ठेवा धान्ये । अभयदान आचरा पुण्य । देवपूजा षट्कर्म दिने । सुपात्रदान चतुर्विध ।।८४।। धर्म आचरा पुण्य होय । पुण्य विघ्नाचा नाश होय । जिनशासनी साह्य होय । अंबिकामाय वज्रधारी ।।८५॥ तत्समयी जितशत्रु । न धरत वेग वगत्रु । बलोन्मत्त तो ताम्रनेत्रु । पूर्वशत्रुत्वं वैरभाव पै ॥८६॥ क्रोध धडाडे अंतःकरणी । जैसा तो प्रळयीचा अग्नी । अष्टदिशा वेष्टोनि शैनी । दणादणी करघोरवाद्यैः ।।८७।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org