________________
६४२ : आराधना कथाकोष
एकएका दरवाज्यात | नवशे असती बुधीवंत । एक एका स्तंभ धारत | खेळ खेळत सोंगटीचा ||६५ ।। ऐसे खेळती हावभावेन । एक दासी वश्रमा ब्राह्मण । खेळ खेळावया हर्षान खेळतो म्हणोन बैसला ।। ६६ ।। फासा ढाळिती मदोन्मत्त । एकमेका द्रव्य जितीत । द्रव्यमदान जाले मस्त । जुवा खेळत चडोवडी ।। ६७ ।। ऐसे खेळता एके दिनी । सर्व जितिले ब्राह्मणी । द्रव्याचा मद धरोनी । जिंतिला सर्वांनी ब्राह्मण ॥६८॥ गेला डाब देत घेत । दैवयोगेन सर्व प्राप्त | पुनः पुनः एकमेकात । पुण्यसंचित हारविती ।। ६९ ।। नरास द्रव्यही येईल | कर्तृत्वात प्राप्त होईल । आयुष्यांती देह जाईल । धर्मं राहिला जीवामागे ॥७०॥ नरदेह दुर्लभ जीवात । जैसा डाव पडे अवचित । किंवा संपत्ति होय प्राप्त । संतति होत पूर्वदत्ते ॥ ७१ ॥ | तैसा शीघ्र मनुष्यजन्म | दुर्लभ जीवासी उत्तम । जानोनी चित्ती कथा उगम । पुण्यधाम करावे त्वरा ||७२ || सुद्धमति करोनी चित्ती । देवपूजा भावार्थभक्ती । चार दान पात्र सुयुक्ती । व्रतशील करिती उपास ||७३ || नरदेह सर्वात श्रेष्ठ । उत्तम कुळ त्या वरिष्ठ । श्रावक गुणधर्म पृष्ठ | जिनगुण गोष्ट हे दुर्लभ ||७४ ||
॥ फाश दृष्टान्त २ ॥
तिसरा दृष्टान्त बुधीजन । जानोनी धर्म आचरण । आचार मोक्षमार्गान । मार्गपेन पंचमगती ॥७५॥
॥ अथ धान्य दृष्टान्त ३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org