________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६४५ ऐसे जानोनी भव्यजीवन । कैसेही करा जिनपुण्य । जेन होय मुक्तीगमन । इयापरी ध्यान्य दृष्टान्त ॥१००।।
॥ इति धान्य दृष्टान्त द्वयं ४ ॥ श्लोक:-छूतदृष्टान्तमावच्मि शतद्वारे पुरे तथा । द्वारपंचशतान्येव द्वारे द्वारे मनोहरे ॥१०१॥ तृतीय जुव्याचा दृष्टान्त । सज्जनी ऐका एकचित्त । मार्ग सापडे मोक्षपंथ । परमार्थ सिद्धान्त वळखी ॥१०२।। शतद्वारपूरनगर । त्या नगरीत शतद्वार । एक्या द्वारवंटया अधार । धर्मशाळा थोर पंचशत ।।१०३।। एकाएका शाळा भीतरी । सहस्रार्ध असती जुम्हारी । ज्ञानी खेळती नानापरी । कुशलत्व भारी द्वाररक्षका ॥१०४|| जुवारी एकच ईनामा । खेळू आला तो दूतकामा । सर्वे जितुनिया धामा । पुण्य आत्मा सुखी भवेत् ॥१०५॥ स्वेच्छा हिंडोन देशांतर । चईनामा तो दूतकार । येता ते मिळाले समग्र । कर्मयोगानुसार तेही पै ॥१०६॥ तैसा मनुष्यजन्म गेला । पुनः न सापडे जीवाला। किंचित् पुण्य सापडला । दुर्लभ धर्माला करा सर्व ॥१०७॥ याअर्थी द्वितीय दृष्टान्त । ह्याच ग्रामी अन्य शाळात । नीळ लक्षीमन तो दूत । यशे तयात नय पापे ।।१०८।। स्वप्नात जय नय तया । किंचित् पूर्वीच पुण्य उदया। खेळता जय प्राप्त तया । शुभ उदया जितिले सर्व ॥१०९॥ सर्वानी द्रव्य हारविले । कापडी कासी देशा गेले । कित्येक दिवस भ्रमले । पुनरपि आले स्वग्रामासी ॥११०।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org