________________
६१४ : आराधना-कथाकोष
मातंगासी क्रोध उत्पन्न । गुरूआज्ञेचा अपमान । तुझी विद्या निर्फळ जान | दांभिकपन प्रपंची तू ।। १५५ ।।
राजा आदि सर्व पुसती । कारण सांगा आम्हाप्रती । विद्यार्थी विनय गुरूभक्ती । ऐकोन तृप्ती सर्व जाहाले ।। १५६ ।।
तेव्हा तो विष्णुभक्त लज्जित । गुरूसी जाला शरणांगत । विद्या सुफळ व्हावी मात । आज्ञांकित मी तुमचा ।। १५७ ।। शीष विनय पाहोन । सद्गुरू जाले त्या प्रसन्न ।
कविद्या दत्त देवोन । क्षेमकल्यान शीषराया ।। १५८॥
अहो हो सज्जन हो सर्वो । गुरूकृपाते संपादावी । जिनवानी हृदई धरावी । भावना भावावी मोक्षाची ।।१५९।।
तत् समयी सभांतरी । राजा मंत्री सर्व परिवारी । चांडाळरूप तो व्यंतरी | सभांतरी प्रकट जाला ।। १६०॥
विद्युत्प्रभ राजा पाहे । प्रेम प्रीती करि विनय । तया पाहोनी राजा हृदय । आनंद न समाय पोटात ।। १६१ | तयाचा विनय पाहोनी । विद्या दिधली बहुरूपिनी । गुरूकृपा ते संपादोनी । विद्यालाभ मनी गृहं गत्वा ॥ १६२ ॥
त्यासभे मीळनी भारी । जैनधर्माची देखली थोरी । मिथ्याती जाले श्रावकाचारी । घरोघरी मंगळाचार ॥। १६३।।
गुरू विनय करोन । ज्ञानोपयोग जीवा उत्पन्न । सर्व कार्यासी समाधान । गुरू त्रिभुवनतारक ।।१६४।।
गुरू जानावा तोचि देव । जीव देव गुरू सद्भाव | मोक्षमार्गाचा उपाव | सार्थक करावे जन्माचे ।। १६५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org