________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६१५ श्लोक-यस्य श्रीजिनपादयुगुले देवेंद्रचंद्राचितः । शास्त्रसविनयः तथा मुनिजने जैने सदा तिष्टति ।। तस्य श्रीजयकीर्तिकांतिविलसत्बोधादयः सद्गुणाः । प्रीत्या पार्श्वे निवासिनोऽतिनितरां तिष्ठन्ति शर्मप्रदाः ।।१६६॥ श्रीजिनेंद्र पदयुगुळ । शतेंद्र वंदिती विनयांजुळ । सदा तिष्टती भव्यमेळ । गुरू दयाळ जयकीर्ती ॥१६७।।
॥ कथा ८९ ।। ऐस्या कथा या समाप्त । श्रोता सज्जन ज्ञानवंत । उपध्ययन कथांमृत । श्रवणतृप्त मोक्षमार्गी ।।१६८।। श्लोक-पादपदद्वये नत्वा जिनेंद्रस्य शुभप्रदं । उपधानकथां वक्षे यतः सौख्यं भजाम्यहं ॥१६९।। अहिच्छत्र नगरराजा । वसुपाल पालक प्रजा । ज्ञानी पाठ धर्मार्थकाजा । वसुमति भाजा सम्यक्त्वी ॥१७०॥ त्या रायाने पुण्य योजिले । सप्तक्षेवी द्रव्य चिले। सहस्रकूट चईत्याले । बिंब स्थापिले पासोबाचे ।।१७१।। कवने एके अवसरी । तो राजा श्रीजिनमंदिरी । चैताल्यात गिलावा करी । कारागिरी कळावंत तो ।।१७२।। राजा वदे दिवसा करा । कामारी लुब्ध मांसाहारा । दिवसा लोळे सैरावैरा । गिलावा करा रात्रौ करी ॥१७३।। जिनधर्माचे कामावर । नेमिक असावे कारागर । मिथ्या व्यसनी तो गवार । देवता क्रूर चेळकरी ।।१७४।। रायासी समजले कपट । कारागर हृदयस्फोट । आपनिंदा करी तो स्पष्ट । म्हणे म्या नष्ट कार्य केले ॥१७५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org