________________
प्रसंग पंचेचाळीसावा । ६१३
गुरूकृपा संपादावी । विद्या याचना ते करावी । गुरू संतुष्ट स्वस्वभावी । विद्या द्यावी सुखप्रदायक ॥। १४३ ॥ स्वामिप्रसादे करोन । विद्यासाध्य अनेक पूर्ण ।
हे ऐकताच वचन । करी नमन भागवत ॥ १४४॥
अहो कृपा करावी स्वामी । विद्या सांगा विद्यार्थी आम्ही | लोभप्रपंच हृदयधामी कामिक कामी कामातुर ।। १४५ ॥ साष्टांग नमस्कार करोनी | भक्ति भावार्थं दाखवुनी । तुमचे प्रसादे करोनी । विद्यासाधनी साधीन मी ।। १४६ ।। तथा तेन मातंगेन । सांगे विद्येचे त्या पठन ।
काळ साहे दुष्टाकारण । विद्यासाधन विष्णुभक्ता ।।१४७।। गुरू आज्ञा घेवोन त्वरे । भोजनवेळा राजमंदिरे | राजा पुसे का हो उशीर । राया तप थोर म्यां केले ।।१४८। तपमाहात्म्य पाहोनिया । इंद्र ब्रह्मा आले मम ठाया । त्यासी संबोध करोनिया । पाचारिता या आम्हापासी ।। १४९।।
त्या सवे वेरझार करिता | वाढवेळ गगनपंथा ।
दिव्या शोभा विलोकिता । जाली तृप्तता मनाची राया ।। १५० ।। तेव्हा धनसेन राजा म्हणे । हे आश्चर्य आम्हा दाखवणे । प्रभात मठासी येईन । करू भोजन आम्ही तुम्ही ॥। १५१ ।। येरे दिवशी राजादि सर्व । पाहू पातले ते अपूर्वं । राजा राणी ग्रामिकभाव । पाहावया मेळाव पातले ।। १५२ ॥ ब्रह्मा विष्णु रुद्रादिरूप | इंद्रचंद्रसूर्यप्रताप ।
विद्याबळ दावि नेकरूप । कार्यार्थ अपजन भोंदि तो ।। १५३॥
तत् समयी चांडाळ समजला । प्रकटरूपे तेथे आला । म्हणे रे रे तमाशा केला । आत्महिताला चुकलासी ॥ १५४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org