________________
६०८ : आराधना कथाकोव
कोन्ही घेताती जैनधर्मं । कित्येक घेती व्रतनेम । जिनधर्माचे जे जे वर्म । त्याचही मर्म जानताती ॥८८॥ जिनबिंब वसई थोर । तीर्थयात्रा प्रतिष्ठा चतुर । चतुर्थ दानाचा प्रकार । षट्कर्मशास्त्र धनखर्च ॥ ८९ ॥ श्लोक - श्रीमन्सारजिनेंद्र देवगदितं त्रैलोक्यसंपूजितं । नानाशर्म विधायकं भवहरं स्वर्मोक्षदं सत्तपः ॥ आराध्यैव विशुद्धभक्तिभरतो यं साधवो धीधनाः । प्राप्ताः मुक्तिसुखं विनाशरहितं कुर्वन्तु ते मे श्रियं ॥ ९० || श्रीजिनेंद्रवचनोक्तीसारं । नृसुर सुखात देणार ॥ तप लक्षुमी धर्मसार । सर्वं सौख्य थोर अविनाश ॥ ९१ ॥
1
शांसी कथा जाल्या संपूर्ण । पुढती काळाध्यय निरोपन । तत्त्वार्थ सिद्धान्त माध्यान । पुराण श्रवण सर्वदा ॥ ९२ ॥ श्लोक - यस्य ज्ञानं जगत्सारं संसारांबोधिपारदं । तत् प्रणम्य जिनं वक्षे कालाध्ययनवृत्तकं ॥ १३॥
॥ कथा ८६ ।।
वीरभद्र तपस्वी ज्ञानी । महानिबिड दाट वनी । गुरूकृपे आज्ञा घेवोनी । अकालध्ययनी अहोरात्र || ९४ ||
श्रुतदेवी प्रकट तेथ । त्यासी संबोध करायात | गौळणी रूपे ते त्वरित । मधुरतकात पुकारी ॥ ९५|| मुनीसमीप मधुर स्वरे । घ्या हो घ्या म्हणे सुंदर । मुनी बोलले वीरभद्र । आ वो गव्हारे का जल्पसी ॥९६॥ अवकाळी निरंजनात | कोन घेतील तव दधीत । देवी ऐके ते वचनोक्त । प्रत्योत्तर त्यात देतसे ||१७||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org