________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६०७
धर्मं श्रवण मनी तोष । देविसी जाला हो संतोष । मुनीपद नमी भक्तिहर्ष । जाल औघ्यास आश्चर्य पै ॥ ७६ ॥
धर्मं जय देवतावस्य । अनर्घ्य वस्तु ये हातास । धर्मं सौख्य वसुंधरेस । धार्मिकास कामधेनु च ||७७|| काय वर्णन त्याच करू । धर्म त्रिभुवनीचा तारू । मनईच्छित फळ दातारू । अमोल अपार निधी रिधी ॥७८॥ विष्णुदत्त तयासी म्हणे । भावार्थ पुरे द्रव्य देणे । शब्द उपसर्गाच कारण । करिता देवीन देखिल ||७९|| दिव्य रूप प्रकट करी । मुनीपूजा सद्भावे करी । रत्नरासी तत् चरणाग्री । स्तुत करी धन्य मुनीराय ॥ ८० ॥ श्रीमत्जिनेंद्र प्रभावेन । जीव त्रिजगी पूज्यमान । इंद्र नरेंद्र देवता लीन । स्वहितकारन जानोनिया ॥८१॥ पाहोन तपाची लक्षुमी । निंदा करी हृदयधामी । म्हणे मी दुर्बुधी अधर्मी । निंदिला स्वामी द्रव्यलोभे ॥८२॥ धन्य मुनी हे धीरवीर । महातपस्वी दिगंबर | अष्टकर्म करोनी दूर । स्वदेहावर विरक्त जो ॥८३॥ आम्ही द्रव्यलोभी तस्कर । असत्य द्रव्य संग्रह फार । तो उतरावया पापभार । शरण चरणाग्र भावार्थ ॥८४॥ विनयस्तुती करोनिया । दीक्षा मागे मुनीराया । भव्यजीव तो जानोनिया । शूरमंत्र तया दिधला ॥ ८५ ॥ गुरुची भक्ती पाठशक्ती । मोक्षमार्गाची चढे मती । अहो धर्म वसे ज्याचे चित्ती । सुख उत्पत्ती सुधर्मान ॥ ८६ ॥ हे जानोन वो भव्य जीव । स्वात्महित विचाराव । ते पाहोनिया पुत्रादि सर्व । सोडिला गर्व जाती मद || ८७ ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org