________________
६०६ : आराधना कथाकोष
जीवासी घडले निंद्यकर्म । गुप्त प्रकट घडे अधर्म । हे सांगावे सर्वही वर्म । कर्म वर्म दूर होताती ॥६४।। याचि अर्थीचा कथितार्थ । वरेंद्र विषय देशात । देवि कोटयपूर ग्रामात । ब्राम्हण तेथ सोमशर्मा ।।६५।। वेदवेदांग महाज्ञानी । सोमिल्या तयाची कामिनी । तयासी पुत्र युग्मगुणी । वायुभूती अग्निभूती द्वै ।।६६।। त्याच नगरी विष्णुदत्त । विष्णुस्त्री कामिनी तयात । धनसंग्रह यथास्थित । पूर्वपुण्ये प्राप्त जीवासी ।।६७।। त्या पासी सोमदत्तान । ऋण घेतल कृत्यकारण । प्रपंच संतत संयोगेन । धनखर्च ऋण जाहाले ।।६८॥ यदा विचार करी मना । गेला देवाचे दर्शना । धर्मसार केला श्रवना । पुण्यविना मानव ।।६९।। पश्चात्ताप जाला जीवासी । दीक्षा घेतली मुनीपासी । पठन आगम सिद्धान्तासी । गुरू आज्ञेसी एकलविहारी ।।७।। भव्यजीवा उपदेश करीत । जन्मभूमी कोटयपुरात । विष्णुदत्तात पाहे अवचित । आपुले द्रव्यात मागावे ।।७१।। याचे पुत्र जाले निर्धन । द्रव्य देइ वो झडकरून । सोममुनीत ते ऐकोन । धरिले मौन तपोनिधी ॥७२॥ विष्णु म्हणे चाल मत् गुरूपासी । वीरभद्र तो स्मशानासी । धर्मं विकोन दे द्रव्यासी । तेव्हा तुजसी सोडीन मी ।।७३।। त्याला नेले स्मशानात । वीरभद्र देवता तेथ । बोले देवता त्या मुनीत । तव धर्म विक्रीत सांगावा ।।७४।। आगम सिद्धान्त मूळोत्तर । दशलक्षण महाथोर । धर्म अमोल पृथ्वीवर । श्रीमत् जिनेंद्र कथितार्थ ।।७५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org