________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६०५
त्यान शेंडि वेणी बांधून । पापीन पापी ते खिळोन । तेव्हा उदय जाला दिन । नारी नर जन पश्यती ॥५४॥ लोका म्हणती दुराचारी । सोडा म्हणति घरोघरी । न सुटे गाठ ते व्यंतरी । राजमंदिरी न्याय गेला ॥५५॥ राव पुसे त्या कारण । ऐसे का जाले तुम्ही सांगण । ते न बोलती लाजीरवाण । राजा म्हणे कपटी तुम्ही ॥५६॥ व्यंतर प्रगट तत् समयी । सांगाल तरी सुटाल सई । राया सांगती दोघही । उपाध्यायी मारला आम्ही ।।५७।। तेव्हा ते सोडिले व्यंतरान । देवा गुरू सांगावे गा-हान । कर्तृत्व प्राचित घेवोन । निर्दास होऊन सुखी राहावे ।।५८।। श्लोक:-शल्येनेव यथा प्रपीडिततनुनिष्काश्य शल्यं भटः। संप्राप्नोति सुखं तथाच सुधियः श्रीजैनसूत्रान्वितान् । श्रित्वा श्री मुनीनायकान् शुभतरान् भूत्वा च शल्योद्भिता । स्वात्मोत्पन्नकुदोषगर्हणभरै नित्यं भजंतु श्रियं ॥५९॥ जीवाष्ट मद करोन । कर्म करिता लागे दूषण । ते जिनाग्रे प्रगट करोन । जिनचरणेन निर्दासी ॥६॥
॥कथा ८५।। पंच्याएशी जाल्या कथा सर्व । पुढति भाविके चित्त द्यान । कान्हामात्रेसी सांभाळावे । क्षमाभावे शास्त्र सूचना ॥६१॥ श्लोक:-संप्रणम्य जिनाधीशं सारधर्मोपदेशकं । सोमशर्ममुनेर्वच्मि शर्मदं सुकथानकं ॥६२॥ टीकाः श्री वीतराग नमु भावे । धर्मोपदेश करू भव्य । सोमशर्म मुनीवैभव । ऐकता भावे मोक्षमार्ग ॥६३॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org