________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६०९
तूची गवार अवकाळी । तीर्थंकर वचनावळी । सूत्रसिद्धान्त निसिमेळी । पाठ अकाळी न पढावा ||९८ ॥ मुनी समजले अंतरी । नक्षत्र पाहिले अंबरी । गुरुसन्निध झडकरी | पृच्छा करो मुनीची क्रिया ॥ ९९|| मुनी म्हणे शीषराया । प्रहरदिन आलिया ।
सूत्र न पाढावा व्यर्थ वाया । मर्यादा हृदया द्विपक्ष ॥ १०० ॥ शीष धरोनी चित्तात । हृदयी मानी आत्महित । श्रुतदेवता पाहोनी त्यात । संतोष चित्तात मानिला । १०१ । संतुष्ट होउनी अंतरी । अष्टविधान पूजा करी । इंद्र नरेंद्र विद्याधरी | सद्गुणारि पूजिजाती ॥१०२॥ ऐसे मुनी गुणी मंडित । दर्शन - ज्ञान-चारितवंत । अनुक्रमे मुक्तिकांत | मम दीनात बुद्धिदाता ॥ १०३ || श्लोक - तस्मात् श्रीजिनभाषितं शुभतरं ज्ञानं जगन्मोहनं । नित्यं सारविभूतिशर्मजनकं स्वर्गापवर्गप्रदं ॥ युक्त्या भक्तिभरेण निर्मलधियो विश्वप्रदीपं हितं । श्रित्वा शोककलंकपंकहरणं कुर्वन्तु सन्तः सुखं ॥ १०४॥ यासाठी जिनभाषितज्ञान । नित्य करावे शास्त्रश्रवण | जेन स्वर्गमोक्षाचे कारण | सौख्यनिधान भवभवी ॥ १०५ ॥
Jain Education International
ज्ञान कथाकोश ग्रंथ । सत्यांशी जाल्या समाप्त । पुढती ज्ञान धर्मामृत । श्रवण वक्त्रात तृप्त व्हावे ॥ १०६ ॥ श्लोक- नत्वा जिनं जगत्वंद्यं केवळज्ञानलोचनं । अकाळाख्यानकं वक्षे सतां संबोध हेतवे ॥ १०७॥
|| कथा ८७ 11
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org