________________
६०२ : आराधना-कथाकोष
श्रद्धा जिनधर्माची मनी । दुःखव्याधी पापाची हानी । इंद्र नरेंद्र पद पावोनी। दीक्षा घेवोनी अतिमोक्ष ।।१९।।
॥ कथा ८४॥ चौन्यांशी कथा हे समाप्त । पुढती श्रोते हो द्यावे चित्त । तप आराधना हा ग्रंथ । क्षमायुक्त श्रवणी धरा ।।२०।। श्लोक:-सर्वदेवेंद्रचंद्राद्यैः पूजितं श्रीजिनेश्वरं । संप्रणम्य प्रवक्षेहं स्वात्मनिंदाफलोत्करं ॥२१।। काशी देश तो विख्यात । वाराणसी नगर त्यात । राजा विशाखदत्तो अद्भुत । स्त्री गुणवंत कनकप्रभा ।।२२।। विचित्र नामा चित्रकार । नाना चित्रकळा चतुर । विचित्रादिपति स्त्रीसुंदर । मनोहर रमण रमणी ।।२३।। तयो कुसीमी बुद्धिमती । पुत्रीज्ञान चित्राचि मती । एकदा भूपमंदिराप्रति । चित्रोत्पत्ती रंगीत महाल ॥२४।। चित्रकार नित्य चित्र । काढिता एके दिनी कलत्र । भोजना बोलावया तत्र । आली वगन सुभानना ॥२५॥ भोजना गेला चित्रकारी । चित्रलिखित बुद्धीसुंदरी । मयूररत पिच्छ उभारी । नृत्य करी कामासक्त ।।२६।। लांढोरी त्या स्त्रियाचा मेळा । नृत्य करी कामाची लीळा । अश्रुपात नेत्रकमळ । झेलिती सकळा कामतृप्त ॥२७॥ ऐसेचि ते मनोहार । राजा पाहे आपुले नेत्र । हृदयी उत्पन्न कामलहर । कामातुर विकळ जाला ॥२८॥ चित्रकारासी पुसे राजा । चित्र लिहिल कवने काजा । तो म्हणे मम अनुजा । सहजी सहज चित्रिले ।।२९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org