________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६०३ राजा म्हणे ऐसी ते गुणी । तयसी दाखवी नयनी । कन्या आनिली पडद्यानी । पाहे लोचनी भरयौवन ॥३०॥ राजा म्हणे अहो मामा । कटाक्ष द्यावी तुम्ही त्या । मामा म्हणे तुम्हासी भामा । दासत्व कामा देउ काय ॥३१॥ जरी कराल पट्टराणी । भाख द्यावी मज लागुनी । तुम्ही या पृथवीचे धनी । सत्यवचनी सम्यक्त्वी ॥३२॥ राय सर्व कबूल करोन । विधियुक्त पाणिग्रहण । पट्टराणी पद स्थापून । सुखसंपन्न पुण्ययोग ॥३३॥ बुधमती सुंदर नार । आज्ञा पाळिती समग्र । परी त्या स्त्रियचा मछर । शब्द ठोसर कुळहीनी ॥३४॥ ईचाच जाला गे फैलाव । राया दावी रूपवैभव । शब्द ठोसला नित्यमेव । तो न सोसवे बाळि केसी ॥३५।। तिन वजिले अन्नपानी । देहे दुर्बळ जाली राणी। म्हणे देवा त्रैलोक्यधनी । सुख होवोनी दुःखप्राप्त ॥३६॥ जावोनिया जिनमंदिर । आपनिंदा ते करी फार । देवा व्यर्थ हा संसार । दुःखाचा भार मम सीरि ॥३७॥ मी रांड पापीन अत्यंत । धार्मिकाची घडली संगत । संसारसुखही समस्त । परि शब्दमात सोसवेना ॥३८॥ अहो देवा जिननायक । स्वर्गमोक्षाचे दायक । कुळहीन पापीन मी मूर्ख । दोष दुःख कोन्हासी देउ ॥३९॥ देवा मी त्वमेव शरण । दुःखदावाग्नि निवारण । आपनिंदा नित्य नित्यान । दुर्बळ कामीन पाहे राजा ॥४०॥ रमण म्हणे गे रमणी । किमर्थ दुर्बळ चिंता मनी। मुप अळगी अंकासनी । गहिवर नयनी अश्रुपात ॥४१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org