________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६०१
न चले कोन्हाचेच काही । महाव्याधी पीडित देही । रयत दुःस्थित सर्वही । राजा देही क्षीद तळपे ।।८।। जैसा मत्स्य जळरहित । दुर्जने पापी घात सोसीत । किंवा पतिव्रतेचा कांत । गेला दूरस्थ बहुदिन ॥९॥ सिर्थद्यो श्रावक प्रधान । तो सम्यक्त्वी गुणीजन । रायासी म्हणे धीर धरणे । औषधपान यत्ल करू ॥१०॥ त्वरित वाचवी मम काया । जे मनसी देईन त्वया । धर्मवंता पाळिसी दया। प्राण सखया धर्मवंता ।।११।। मंत्री गेला देवदर्शनासी । दर्शन वंदन सद्गुरूसी । मुनीपद प्रक्षाळ जलेसी । त्या औषधासी घेतो त्वरे ।।१२।। राया आणोन केले प्राशन । सर्वही व्याधि विनाशन । श्रीजिनगंधोदकेन । श्रद्धादि गुणसंयुक्त तो ।।१३।। ते विनयंधर भूपति । जळसुधी व्याधी निवृत्ती । जेवि निर्मळ तो गभस्ती । किरण फाकती राजचिह्न ।।१४।। सूर्योदयी जैसा अंधोत्तम । मुनीप्रभावे राजोत्तम । स्वामी पद जल उत्तम । सर्व ग्राम प्रशंसा करिती ।।१५।। यथासिद्धान्त मंत्रीपान । मुनीपद जळ राया देऊन । तथा श्रद्धाभावे भव्यान । करावे प्राशन मुनीतीर्थ ।।१६।। ऐसे मुनीपदाब्जतीर्थ । सदैव वंदा भवहितार्थ । मनि श्रद्धा भावार्थयुक्त । धर्माची युक्त शक्तीसार ॥१७॥ श्लोक-बाहुल्येन करोति या शुभतरा, सत्केवलाद्योतनं । व्यक्तानंतचतुष्टयं शिवकरं सा शर्मणेवोस्तु वै । श्रद्धा श्रीजिनधर्मकर्मणि सतां दुःखौघविध्वंसिनी देवेंद्रादि-नरेंद्रचक्रीपदवीशर्मप्रदा स्तोकतः ।।१८।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org