________________
प्रसंग चौरेचाळीसावा । ५९७
पुढील कथा तपाचा प्रभाव । श्रोते सज्जन भव्यजीव । क्षमा धरोन श्रवण करावे । श्रवणे व्हावे शुभमंगल ।। १७३ ।। श्लोक - नत्वा पदद्वयं जैनं शर्मदं त्रिजगत्-हितं । ब्रुवेहं शकटालस्य मुनेर्वृत्तं बुधैर्मतं ।। १७४।। पाटलीपुर ते विख्यात । नंदराजा सधर्मवंत ।
तत् मंत्री सम्यक्त्व पुनीत । धर्मी रत शकटालाख्ये ।। १७५ ।। वरादिरूचि द्वितीय मंत्री । अधर्मी कपटी अंतरी | कुबुधी तो मिथ्यात सूत्री । वैर धरी जैनधर्मासी ।। १७६ ।। एकदा श्री सद्गुरूराज । महापद्म श्री मुनीराज । त्रैलोक्यवंदनी श्रीपूज्य । चारितध्वज ज्ञानवंत ।।१७७ || राजा प्रदान सर्व रहित । गुरूपूजा शास्त्रयुक्त । द्विधा धर्मं करोनी श्रुत । वैराग्य प्राप्त शकटालासी ।। १७८।। दीक्षा घेतली विनयान । गुरूभक्ती शास्त्रोक्तीन । आचार्य पदवी गुणज्ञ । जाला सर्वज्ञ गुरूकृपे ।। १७९।। एकलविहारी होउनी । धर्मोपदेश सर्वाजनी । तीर्थयात्रा पुण्यखानी । आले भुवनी जन्मस्थळ ।। १८०।। पाडळिपुर नगरात | प्रवेश केला आहारकृत्य ।
राजगृह अंतःपुरात | निरांतराय अक्षयदान ।। १८१ ।। ग्रामप्रदेशी ध्यान धरी । वरादिरुची पूर्ववैरी ।
नरेंद्रभूपासी चाडि करी । तव मंदिरी शकटालाख्य ।। १८२ ।। मुनीचा धरोनिया वेस । अंतःपुरी केला प्रवेश । कामचेष्टा तो करी हासे । नंदभूपसे क्रोध आंतरी ।।१८३ ।। पापी पूर्व धरोनी वैर । पाप करिती महाथोर । ऐसे जानोनिया चतुर । हिंसा ऋण वैर न कीजे ॥ १८४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org