________________
५९८ : आराधना-कथाकोष
राजा जमदेमदात्धीसी । सारासार न कळे त्यासी । सुभट पाठवी वधीसी । करा घातासी तयाचे ॥१८५।। वरादिरुचि पूर्व वैरी । द्वेष धरोनिया अंतरी । जावोनिया वनांतरी । नानापरीचे परीसह ॥१८६।। शकटालाख्य मुनी धीर । दुष्ट कुबुधी जेवि खर । काष्ठ मृत्तिकानि फत्तर । शस्त्रास्त्र दुर्जन कुधी ।।१८७।। सर्व संन्यासासी घेवोनी । समाधि साधी मुनी ध्यानी । अंतःकाळी स्वर्गभुवनी । सुख सदनी पूर्ण आयु ।।१८८॥ दुष्ट करिती ते दुष्टावा । तयाचा जन्म नर्क ठेवा । अनंतदुःख नाही विसावा । चौन्याशी गोवा जीवासी ॥१८९।। स नंदविवेकी तो राजा । परीक्षे पाहे विचारी भाजा । निर्दोष घात मनी राजा । पापभाज्या म्या वरिली ।।१९०।। आपनिंदा करोनी वेगी । दोषाचा डाग दुष्टसंगी। त्वरित निघे लागवेगी । धर्मस्य वेगी त्वरिताच ॥१९१।। महापद्म श्री मुनीराय । त्रिःपरीत्य नमोस्तु पाय । द्विविध धर्म श्रुतहृदय । व्रतविधाय श्रावकसुधी ।।१९२।। तुर्यदान श्री जिनपूजा । षट्कर्म त्या सहित भाजा । त्रिपनक्रिया धर्म वोजा । पुण्यकाजा प्रवर्तला ॥१९३।। कोन्हीही जीव कुसंगान । महा पापाचे करी कारण । सद्गुरूचे जाल्या दर्शन । पापनाशन पुण्यप्राप्ती ।।१९४।। यासाठी तुम्ही भव्यप्राणी । सद्गुरूसेवा करावी त्यानी । गुरूकृपे स्वर्गभुवनी । मोक्षसदनी अनुक्रमे ।।१९५।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org