________________
५९६ ! आराधना-कथाकोष
अणुव्रती पाहोन त्यात । तत् समयी पाहिला एकांत । पापी नित्य होता जपत । केला घात जयसेनाचा ।।१६३।। कोन्हा न कळता गेला निघोन । हे पाहिले वो श्रीगुरून । पाप केले मम शिष्यान । घेतले अनशन तत् घडी ।।१६४।। दर्शनद्रोह होईल । म्हणोन भीतीवर ल्हेले । आहि नृप न मारील । पूर्वपापे जाले मृत्यासी ॥१६५।। शस्त्र विदारिता मुनी । सर्व संन्यास करोनी । देहे ठेविला धर्मध्यानी । स्वर्गभुवनी सर्वसुखी ।।१६६।। वीरसेन राजपुत्र । जयसेन पाहे नजर । लीप पाहिले भीतिवर । श्रीगुरू धीर प्रशंसिले ।।१६७।। पितादी देहे संस्कारिले । सोक पावोन शांत जाले । संसार अनृत पाहिले । वैराग्य भाविले तपभाव ॥१६८।। दुष्टात्मा पाप आचरती । ते कुगती भोगिताती। धर्मात्मी याला सुख संपत्ती । निर्दोष होती भव्यप्राणी ।।१६९।। श्लोक-यः श्री देवनिकायभूपतिशतै नागेंद्र सत् खेचरैः । पूज्यो भक्तीभरेण शर्मनिलयो धर्मो जिनेंद्रोदितः । नानादुक्ख विनाशको भवहरः स्वर्गापवर्गप्रदः । स श्रीमान् भवतां जगत्रयहिता दद्यात् सुखं मंगल ॥१७०।। ये श्रीजिनदेव जगत्रयवंद्ये । पूजा भक्ती विधीयुक्तसुधे । नाना रोग विनाश सुखदं । जयत्रय हितदं मंगलं ॥१७१।।
॥कथा ८१॥ एक्यांशी कथा हे संपूर्ण । श्रीरत्नकीर्ती सद्गुरून । लडिवाळा देऊन ज्ञान । सारदे मातेन साह्य केले ।।१७२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org