________________
५९० : आराधना-कथाकोष
ज्ञानविज्ञान आनि सद्दानं । श्रीजिनगुरूपूजनेनं । पूर्वाभ्यासे पूर्वपुण्यन । चतुराई संपूर्ण प्राप्त होती ।।९६।। प्रजापाळ हाराते पाहे । म्हणे चमत्कार दिसताहे । सदृष्टि प्रमाण हा आहे । तत् भार्यासी पाहे पुत्रसह ।।९७।। विमला सुता तत् समयी । जातिस्मरण जाल हृदयी। रायास वदे मी अन्यायी । पूर्वील भवई हार गुफी ॥९८॥ मी पूर्वी सुदृष्टी रत्नाकर । गुंफीत होतो ऐसा हार । मरोनी जालो स्त्रीचा पुत्र । पूर्वसूत्र म्या हार केला ।।९९।। पूर्ववृत्तान्त स्त्रीचरित्र । रायासी सांगे तो सर्वत्र । ऐकोन संसृती अनित्य । हृदयात वैराग्य उत्पन्न ।।१०।। सुदृष्टीचे जीवाकारण । विमलासुत राजी स्थापोन । स्वामीपासी दीक्षा घेवोन । मोक्षसाधन आत्महित ॥१०१॥ मुनी जाले ते दिगंबर । तप करिती महाक्रूर । विहार करिती क्षितीवर । धर्मामृत आहार भव्य जीवा ॥१०२॥ ऐसे हिंडता सौरपुरीसी । यमुनानदीच्या तटासी । शुक्लध्यान कर्मरिपुसी । जिंकोनी केवळीसी उत्पन्न ॥१०३।। केवळज्ञान उत्पत्ती । त्रैलोक्येंद्र पूजा करिती । जाले ते मोक्षस्त्रीचे पती । तेचि मजप्रति प्राप्त व्हावे ।।१०४।। श्लोक : स श्रीमान् भवसिंधुतारणपरः सत् केवलज्ञानभाक् । कर्मारातिविनाशकृत् शिवपतिर्देवेंद्रवृंदाचिताः । लोकालोकप्रकाशनकचतुरः स्वर्गापवर्गप्रदो । भूयान्मे भवतां च पूजितपदः स श्रेयसे श्रीजिनः ।।१०५।। श्रीमान् भवसिंधुतारण । कर्मविनाश केवळज्ञान । त्रैलोक्यासी ते पूज्यमान । मम भवतारण जिनेंद्र ॥१०६।।
कथा ७८
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org