________________
प्रसंग चौरेचाळीसावा : ५८९ सत्ताहातर कथा जाली । श्रोता पाहिजे क्षमा केली । जरी असेल चुकी भुली । क्षमा केली पाहिजे वो ।।८४।। श्लोक :-नत्वा जयवधीशैः पूजितं श्रीजिनेश्वरं । वक्षे सुदृष्टिसन्नाम रत्नविज्ञानि वृत्तकं ॥८५॥ उजनि नगरी महाराज । प्रजापाळ तो कृतकाज । श्रीमत्जिनदेवपदाब्ज । भ्रमर सहज मधुव्रत ।।८६।। तयाची सुप्रभा सुंदरी । रूपलावण्यमदनस्त्री । शीलवंती जिनमंदिरी । धर्माधिकारी सम्यक्त्वी ।।८७।। त्याच नगराअतौता नर । रत्नपारखी महाचतुर । सुदृष्टी सुज्ञानी मधुर । संसारसार हितकारी ।।८८।। तत् स्त्री विमलाकुबुधी । वक्राख्ये दासदुर्बुधी। त्यासी रतली ते अबधी । हीनबुधी ते पापरासी ।।८९।। एकदा विमळा दासासी । म्हणे मारावे सुदृष्टिसी । तत् घडि कृतांत तयासी । मन उल्हासी पापी रमति ॥९०॥ मरोन भर्ता विमलोदरी । सुदृष्टी तेथ गर्भ धरी । पुत्र जाला संतोष नारी । पूर्व परिकर्म योगेन ।।९।। अनंतसंसारी हा जीव । क्वचित् दीन वैभव । नर्क तिर्यंच भवाभव । नट सोंगीईव भवविधी ।।१२।। असो एकदा उद्यान वनी । वसंतक्रीडेसी लागुनी । सुप्रभ राजा समुदायानी। रमण रमणी विनोदती ।।९३।। पुष्पहार कंठी शोभत । तो हार क्रीडाविलासित । महासुंदर सुवासित । कांतिमंडित गानप्रिय ॥९४।। राजा म्हणे धन्य हा हार । कोन्हे गुंफिला कारागीर । पुण्यविना ज्ञान चतुर । न लभे प्रकर जीवासी ॥९५।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org