________________
५८८ : आराधना कथाकोष विद्युत्पात होईल जरी । रायभय धरील अंतरी । लोहो मंजुस पेठारि । यत्न करी देह लोभान ।।७४।। तो मंजुस गंगागृहात । नेवोन ठेविला तेथे गुप्त । पूर्ण होता दिवस सप्त । मत्स्य हुसळित बाहे त्यासी ॥७५।। सप्त दिवसाच प्रमाण । विघ्न चुकल पुत्र म्हन । तत् समयी विद्युत्पतन । गेला भंगोन मंजूस तो ।।७६।। पुत्रा वृत्तान्त समजला । शोक पावोनी शांत जाला । अपवित्र ठिकानी पाहिला । जंतु देखिला पंचवर्ण ।७७।। त्याचा करोनिया घातात । मनी समजला पापकृत्य । धिक् धिक् जन्म व्यर्थ । हेही जीवित पुण्यविना ॥७८।। देवरति तो भव्यजीव । त्या उत्पन्न वैराग्यभाव । आता स्वामीसी शरण जाव । स्वहित कराव जन्माचे ॥७९।। राजी स्थापोनिया पुत्रासी । शरणांगत सद्गुरूसी । देवगुरूराज तयासी । शूर मंत्रासी दिधले ।।८।। गुरूकृपेच महिमान । सर्व । मुनीक्रिया संपूर्ण । द्वादशांग शास्त्र जान । अनुक्रमेण मोक्षमार्ग ।।८१।। श्लोक :-सकळभुवनसारं दत्तसंसारदारं । दुरितशतनिवारं यस्य वाक्यं सुतारं । स सृजतु जिनदेवो देवदेवेंद्रवंद्यो । जिनचरणसुसेवां मुविपर्यंतमुच्चः ॥८२।। त्रिभुवनी संसारसार । जन्मोजन्मी दुरितनिवार । वंदनीक ते जिनेश्वर । मुक्तीदार चूडामणौ ते ।।८३।।
॥ कथा ७७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org