________________
भ्रसंग चौरेचाळीसावा : ५८७ मिथुळा नगरीचा राजा । सुभोमा तयाची भाजा । देवरति पुत्र तो प्रजा । पाळक वोजा गुणाकर ॥६२।। एकदा त्याची नगरात । मुनींद्र आले ज्ञानसंयुक्त । देवगुरूकीर्ती नाम त्यात । संघसहित विहार केला ॥६३।। तदा तो राजा महिपती । सहपरिवारे समस्ती । नमन-पूजन-भावयुक्ती । धर्मामृत करिती श्रवण।।६४।। तदा राजा तो करी प्रश्न । मम जन्म कोण ठिकाण । ते मुनीराय ऐकोन । अवधिज्ञानान सांगतुसे ॥६५॥ हे राया तू त्वा न पुसावे । पापकारण न ऐकावे । राजा म्हणे श्रीपूज्य सांगावे । संशयभावे तुटेल ।।६६।। आग्रह देखोनी तयाचा । देवगुरू स्वामी मधुरवाचा । पूर्वपापे जन्म तुमचा । अपवित्नाचा ठिकान जो ॥६७।। महाकृमीजंतु जीवन । अपवित्र भोगिती पापान । आजपासोन सप्तदिन । होणार प्रमाण सांगु तुज ॥६८॥ नगरात प्रवेश करशील । अपवित्र मुखात पडेल । छत्र मुकुट घात होईल । वायो सुटेल सत्राने पै ॥६९।। विद्युत्पात दिवा होउन । रथधात तुझे मरण । तत् गुदईष्टा मुखे ग्रहण । होईल जान राजिंद्रा ।।७०॥ पापाचे उदय करोन । काय न होय राया जान । पुण्ययोग पापदहन । हे जिनवचन पुराणात ॥७१।। पापोदय त्या राजासी । पुण्य नाठवेच रायासी। बोलाउनीया स्वपुत्रासी । विचार तयासी सांगसे ।।७२।। अपवित्र ठिकानी जनन । होता त्वा करावे हनन । जे जे सांगितले साधन । ते ते घडोन आले त्यासी ॥७३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org