________________
५८६ । आराधना - कथाको
जिवित्वलोभ धरोनीया । निंदकर्म केले त्या ठाया । आयुष्यांती मरोनीया । सप्तमठाया नर्कभूमी ॥५२॥ | धिक् मूढत्व जे का प्राणी | विषयलंपट कुज्ञानी । चक्रवर्ती असोन ज्ञानी । देहे लोभ धरोन कुगती ।।५३ ॥ व्यंतराचा वैर फिटोन । म्हणे मी पापी लक्षगुण । नौकराच केल हनन । म्या पाप्यान पाप जोडिले ||५४ || अपनिंदा करोनी फार । तोडिला कर्माचा भवभार । श्रीजिनपूजेनी तत्पर । गुरू निरंतर परमेष्टी ॥ ५५ ॥ धन्य ते जिन पूजनीक | धन्य ते सुदेव सेवक । धन्य तो जिनवानी ऐक । सर्व सुख तयासी होय ।। ५६ ।। श्लोक : - सम्यक्त्वं त्रिजगत्-हितं भवहरं शक्रादिभिः पूजितं । नानाशमं विधायकं गुणकरं स्वर्गापवर्गप्रदं ॥
तत् भक्त्याष्टविधं जिनेंद्रकथितं श्रित्वा च मुक्तिश्रियं । चित्ते भव्यमतल्लिका गतभयं संभावयंतु प्रियं ॥ ५७ ॥ जे का सम्यक्त्वी भव्यप्राणी । षट्कर्मादि देवपूजनी । सप्तक्षेत्री द्रव्य वेचुनी । मोक्षगमनी अनुक्रमे ।।५८|| सुभोमराजाचे चकवर्ती । कथा श्रवण ज्ञानी करिती । क्षमाभाव धरोनी चित्ती । अल्पमती त्या सांभाळावे ॥ ५९ ॥ ॥ कथा ७६ ।।
स्याहात्तर कथा संपूर्ण । पुढे श्रोता करा गमन । सरस्वती मज प्रसन्न । भावार्थाने तुमचिया पै ॥ ६० ॥ श्लोक : प्रणम्य परमानंद श्रीजिनेंद्र जगत्-हितं । शुभाख्य- भूपतेर्वच्मि चरित्रं विरतिप्रदं ॥ ६१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org