________________
प्रसंग चौरेचाळीसावा । ५९१
अष्टसप्तकथा संपूर्ण । श्रोते व्हावे सावधान | कथाकोश तप आराधन । करावे श्रवण अद्वैत ।। १०७ ।। श्लोक :- सर्वदेवेंद्र चंद्राद्यैवंदितं श्रीजिनेश्वरं ।
त्वा श्रुताब्धिमाप्तं च धर्मसिंहकथां ब्रुवे ।। १०८ ।। दक्षिण दीप असे विख्यात । कौसल्या नगरी असे त्यात । वीरसेन प्रजानाथ | स्त्री रूपवंत वीरमती ।। १०९ ।। चंद्रभूती तयाचा कुमर । चंद्रश्री भगिनी सुंदर । राज्य करिती पुण्यानुसार | धर्म निरंतर करताती ॥ ११० ॥ तत् कोसल्य देश विख्यात । कोशल नगरी पुण्यवंत | धर्मसिंह तो धर्मवंत । चंद्रश्रियत परनील ॥ १११ ॥ धर्मसिंहा चंद्रश्री राणी । सुख भोगिती पुण्य करोनी । देवपूजा यंदानी | दशलक्षणी जैनधर्म ॥ ११२ ॥ एकदा तो धर्मसिंह राजा । चैत्याळयासी गेला सहजा । दमधराचार्य गुरूराजा । त्रिकर्ण वोजान नमोस्तु ॥ ११३ ॥ आशीर्वाद धर्मश्रवण | धर्मत्रिभुवनी तारण । श्रावक येती धर्म ऐकोन । दीक्षाग्रहण मुनीच जाले ।। ११४|| चंद्रश्री जाली दुःखित । चंद्रभूतीन ऐकिली मात । भगिनी घेवोन सांगात । गुरूरायात विनवीले ।। ११५ ।।
नूतन वय राज्यभार | टाकल्या नोव्हे हे वो बर । आताचा करा अंगीकार । दीक्षा मोहेर चौथ्याश्रमी ॥ ११६ ॥
अनेक प्रपंच करोन । गृह आनीला महाबळान । राज्य संसारी त्या स्थापोन । गेले सज्जन स्वस्वगृहा ।।११७।৷
पुनरपि सीघ्र गुरूपासी । पुनर्दीक्षा घेत तपेसी । जिनमुद्रा पंचाग्निसी । साधु सायासी आत्मसार्थक ।। ११८||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org