________________
५८४ । आराधना - कथाकोष
तत् अर्ध शत ते दोन । महामत्स्य ते विस्तीर्णं । श्रेष्ठ असे दीर्घायमान । लघु कृतघ्न मनभष्ट ॥३०॥ शालिसिक्ताख्य दोघे बंधू । कर्णमळ भक्षी आब्धु । श्रेष्ठ मत्स्या पूर्वसमंधु । निद्रा आब्ध षड्मास पै ।।३१ ॥ निद्रा करी मुख पसरोन । दीर्घं दाढा एक योजन । त जंतु करिती गमन । ते पाहोन लघुमत्स्य इच्छी ||३१|| ऐसे मुख माझे असत । तरी मी भक्षितो सर्वात । ऐस पाप मन चेष्टित । त्या कर्णमळात भक्षी सदा ।। ३३ ।। मनो-मळ - पापे करोनी । आयुष्यांती श्वभ्रसदनी । महाकष्ट दुर्योनी । भोगी प्राणी सप्तम नर्की ||३४|| अहो हो पुण्य आनि पाप । मनचि कल्पी आपोआप | पापतोचितो यमकोप । पुण्य तो भूप स्वर्गाचा की ।। ३५ ।। याच अर्थी हो नित्य नित्य । सदा करावे जिन श्रुत्य । पूर्व पाप जयान त्यक्त | जिनवचनोक्त मनी कल्पा ।। ३६ ।। श्लोक : - श्रीमत् जैनवचः प्रदीपनिकरं मिथ्यातमोनाशकं । देवेंद्रादिसमस्तभव्यनिवहैर्भक्त्या समभ्यचितं ॥
I
भो भव्या भव - भूरिदुःखदलनं स्वर्मोक्षमार्गप्रदं । नित्यं चेतसि चितयंतु नितरां शान्त्यै भवंतः श्रियः ॥ ३७ ॥ श्री जिनेंद्रवचन ते थोर । जेने हारे मिथ्यांधःकार | भव्य जीवा सुख अपार । मोक्षमंदीर अनुक्रमे ||३८||
॥ कथा ७५ ॥
सयपंचीसी कथा जाली । ते श्रोतेजना श्रुत केली । जरी असेल चुकी भूली | सांभाळिली पाहिजे ज्ञाते हो ॥३९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org