________________
प्रसंग चौरेचाळीसावा : ५८३
रात्रौ तो दुष्टात्मा दुराचारी । अग्निकाष्ठ घेवोनी करी। ध्यानस्थ असती वनांतरी । वैर परी साधीन आता ॥२०॥ समुदाय घेवोन सेवक । काष्ठ मेळविली अनेक । रचना केली दुःखदायक । अग्निचौक प्रदीप्त केला ॥२१॥ स्वयं शीघ्र चौदिशेसी । पुनः टाकिती धूळीसी । पापी करिती पापराशी। नर्कभूमीसी ते जातील ।।२२।। तदा ते सर्वही मुनी । शुक्लध्यान बैसले ध्यानी । दुष्ट उपसर्ग साहुनी । मोक्षसदनी स्वर्गापवर्ग ॥२३।। दुष्ट साधुसी विघ्न करिती । जन्मोजन्मी त्यासी दुर्गती। जे का स्वामिसी शरण जाती । अद्भुत भोगिती सौख्यासी ॥२४॥
कथा ७४ श्लोक:-सन्तस्ते मुनिसत्तमाः शुचितराः सद्ध्यानशैलाश्रिताः । श्रीमत्सारजिनेंद्रतत्त्वचतुरा जित्वोपसर्ग दृढं । संप्राप्ताः स्वविशुद्धभावभरतः स्वर्गापवर्ग शुभं । देवेंद्रादिसचिताः शुभकराः कुर्युः सतां मंगलं ।।२५।। ते मुनी सर्व ध्यानी अचळ । श्रीजिनेंद्र तत्त्व अढळ । दुष्टोपसर्ग तपबळ । जितोनी सकळ सर्वसुखी ।।२६॥ ऐसी हे तप आराधना । श्रवण केली श्रोतेजना । पुढे मनोदोष लक्षण । तप आराधना ऐकावी ॥२७।। श्लोक:-स्वयंभुवं नमस्कृत्य, जिनेंद्रं केवलक्षणं । संबोधाय सतां वच्मि, मनोदोषस्य लक्षणं ॥२८॥ स्वयंभूरमण समुद्र । विख्यात असे महाथोर । सहस्रयोजन विस्तार । तदार्ध नीर अथाक ।।२९।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org