________________
प्रसंग त्रेचाळीसावा : ५७७ माय सारदा वंदोनिया । शिक्षा दीक्षा गुरुचे पाया । मज दीना साह्य होवोनिया । कथा श्रोतिया वदवावी ।।१९१।। पाटली नगरी विख्यात । नंदो राजा राज्य करीत । त्रय मंत्री असती त्यात । कावि शोभत प्रथम हा ।।१९२।। सुबंधु सकटा तीसरा । पुरोहित कपिल बरा । देविला राज्ञी ते मुंदरा । तत् पुत्र चतुर चाणक्य ।।१९३।। वेद वेदांग विचक्षण । षड्शास्त्री ज्ञाननिपुण । एकदा कवि मंत्री येवोन । वर्तमान रायासी सांगे ॥१९४।। देशिक भूप मदोन्मत्त । बळाढये करभार घेत । न देता देश विध्वंसित । उपाय यात नंदराया ।।१९५॥ राजा म्हणे त्या द्रव्य देन । उद्धत नरा नीवारण । मंत्रीन तत् युक्ती करोन । भंडारातून द्रव्य दिल्हे ।।१९६।। परराष्ट्र निर्वाह करोनी । प्रजा संतोषात अवनी । नंदराजा विचारी मनी । द्रव्याची ठेवनी पहावी ।।१९७।। कित्येक दिवसानंतरे । भांडारी बोलाविला त्वरे । द्रव्यसंचय पुसे बरे । प्रधानेच सारे नलेकी ।।१९८।। राव क्रोधाग्नि धडकत । भांडार लुटला समस्त । प्रधानाची सर्व संतत । आंधारीत धातली त्याने ।।१९९।। नित्य चने एकचि मुष्ट । पानी पाजी त्यासि नेमष्ट । द्वारे पच्चि दृढकपाट । अंधारी दाट भयंकर ॥२००।। प्रधान दिधला काढोन । तो गावात फिरे जेवि दीन । त्यासी जाले कित्येक दिन । प्रधानाविन राज्य न चाले ॥२०१॥ कावि प्रधाना बोलाविले । प्रधानपद त्यासी दिधले । मग तेन राया विचारिले । कोठे ठेविले मे परिवार ।।२०२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org