________________
५७६ : आराधना कथाकोष
राज्यबळे तो प्रधान । राणीसी वाद करी दुर्जन । तेन रायासी सांगोन । कोपायमान राजा जाहला ।।१८१ ॥ राजा दुष्ट बोधमती । प्रधान तैसाच मिथ्यामती | द्वेष धरोनिया चित्ती । कपटि करिती अनिष्ट ।। १८२ ॥ यंत्र छेदिती हृदयासी । खिळे रोपिती पदासी । उपसर्ग घोर मुनीसी । करिता तयासी दया नये ।। १८३ ।। दयाविरहित जे नर । कोटयकल्प भोगी अघोर । ते मुनीराय धीरवीर । परीषह समग्र तोसिती ।। १८४ । । तपबळे करोनी ज्ञानी । मेरूसम अचल मौनी । क्षमासम तुल्य मेदनी । शुक्लध्यानी मार्ग मोक्षाचा ।। १८५ ।। राजा दंडाख्य मिथ्यामती । दुष्ट पापी रौद्र कोपति । करू नये तेचि करिती । दुर्गति अनंत संसारी ।। १८६ ।।
परीषह समुदाय भोगोनी | केवळज्ञानी जाले मुनी । त्रैलोक्य पूजनीक होवोनी । उपदेशोनी अंती मोक्ष ।।१८७।। काव्यः - चंचत्सुवर्णगिरिराजसुनिश्चलास्ते । प्रध्वस्तकर्म मलसंगतयो मुनींद्राः ॥ देवेंद्र दानवनरेंद्र - समर्थनीया । नित्यं भवंतु भवशांतिविधायिनो मे ।। १८८ ॥ पंचशत मुनीकथा पूर्ण । श्रीरत्न कीर्तीप्रसादेन । चंद्रकीर्ती अज्ञानपण । तपवर्णन तुर्याराधना ।। १८९ ॥
कथा ७२ सं
श्री जिनेंद्राचे दर्शनेन । सर्वही पापाचे दहन | पंचगुरुसी करू नमन | कवित्व ज्ञान द्या मजसी ।।१९० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org