________________
प्रसंग त्रेचाळीसावा : ५७५ दीक्षा शिक्षा गुरूपंकमळा । विनवीतसे वेळोवेळा । मति द्यावी कवित्वकळा । आप्तलडिवाळा सांभाळी ॥१७०।। श्रोते भव्यजनपंडित । सुकथा ऐकावी एकचित्त । तपव्रतनेमवमकृत्य । मोक्षमार्ग त्यात सहजची ॥१७१।। पंचशत मुनी चरित्र । दक्षिणदेशी भरतक्षेत्र । देश ग्राम पुण्य पवित्र । कुंभकार नगर शुभ ।।१७२।। राजा दंडक अभिधान । राज्ञी सुव्रता ते सद्गुण । बाळकाख्य मंत्री दुर्गुण । धर्म जैन नावडे त्या ।।१७३॥ तत्रैव उद्यान वनात । मुनी आगमन पंचशत । उत्कृष्ट तपस्वी ज्ञानवंत । मुख्य अभिनंदन कीर्त ।
विहार करीत स्थलिल या ॥१७४।। खंडकाख्य ब्रह्मचारी । चर्यार्थ गेला पाहु नगरी । राजगृही करिता भावरी । प्रधान नेत्री पाहे त्यासी ॥१७५।। मंत्री म्हणे हे मुनी कुश्चळ । वस्त्रहीन हे अमंगळ । लज्जारहित हे कश्मळ । सदाकाळ हे वनवासी ॥१७६।। यासी नाही घराश्रम । संतत संपत वस्त्र धाम । कैच व्रत तो कैचा नेम । संन्यासाश्रम न जानती ॥१७७।। ते ऐकोनिया ब्रह्मचारी । रे रे मूर्खा दुराचारी । तुझे गुरू मांसाहारी । घराचारी ते प्रपंचिक ॥१७८॥ आपना संन्यासी म्हणती । षड्पुि हृदयी वसती। गुरु शीष प्रपंच वर्तती । नर्का जाताती क्रियाविण ।।१७९।। स्याद्वादमते तो प्रधान । निंदावाद करी दुर्जन । सुव्रता राज्ञी ते ऐकोन । करी निर्भर्त्सना तयाची ॥१८०।।
www.jainelibrary.org
For Private & Personal Use Only
Jain Education International