________________
५७८ : आराधना - कथाकोष
राव म्हणे पुस भृत्यात । क्रोधे पाहे तो प्रधानात । त्रिवर्षा पाहता त्यात । जाला मृत्य सर्वाचा ॥२०३॥ प्रधान त्यात पाहोनी । गुप्त ठेविले अंत:करणी । नृपे कुटुंबक्षय करोनी | तैसेच करणी मी करीन ॥ २०४ ॥ तयासी कळ न करता । एकदा गेला बागातौता । तेथे गर्त्ता खन खनिता । राजसुतासी जाल श्रुत ।।२०५ ।। चाणक्य पुसे वो प्रधान । या गर्त्तेचे काय कारण । दर्ममूलात उत्पाटन । यत् प्रमाण वैरी कुळक्षय ॥ २०६ ॥ प्रधान म्हणे राजपुत्रासी । क्षय केला मम वंशासी । तेसीच गति करू त्याची । भ्याला मानसी चाणक्य ॥२०७॥ कावि प्रधाना समजाउन । क्षमा करावी वडिलान । मग तो गृहासी येवोन । केले निवेदन स्त्रियसी ॥ २०८ ॥ यशस्वती ते म्हणे स्वामी । चतुर्दान करावी तुम्ही । दानपुण्य आपुल्याश्रमी । वंशधामी वृधीसी होय ॥ २०९ ॥ तं श्रुत्वा कावि प्रधानेन । नंदराजा करिता पुण्य | उपाध्यासी देता दान । भोजन दक्षना शतैक ॥२१० ।। अंतर कपटी तो मंत्री । म्हणे पुण्य करा राजेश्री । चाणक्य बोलावी सत्वरी । परिवारी कपिलपुत्र ।।२११॥ श्रेष्ठासनी बैसविला तो । तेथे मंत्री दुष्टबुधी तो । श्रेष्ठासन समस्तासी तो । पुण्य होम तो करा कैसा ॥२१२ ॥ होमकुंड करी चाणक्य । कृतंन्यास सांगती ऐक्य । आशा तृष्णा वदति वाक्य । येणेच सौख्य तुम्हा होय ।। २१३ ॥ ते ऐकोनिया काविमंत्री । रे रे भट निघा बाहेरी । राजाज्ञा ऐसी वैखरी । घालावे बाहेरी सर्वही || २१४ ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org