________________
५७२ : आराधना-कथाकोष
चिलाईत कथा संपूर्ण । पुढील कथेसी लावा मन । भव्य जीव सावधानेन । तपविवर्ण परिसावे ।।१३६।। नमस्कृत्य श्री जिनाधीश । धर्मसार तो उपदेश । धन्य नामा मुनीविशेष । चरित्र विशेष सुखदायी ।।१३७।। जंबूद्वीप महाविख्यात । मेरू पूर्वेसी विदेहात । वीतशोकापुरी पुनीत । राज्य करी अशोक राजा ॥१३८।। धान्यलोभ त्याचे अंतरी । आर्तध्यान तो लोभ धरी । जीवदया नसे अंतरी । क्रोध करी पर जीवाचा ।।१३९।। दाने खातील ते उदंड । खळ्यात बांधि पशुची तोंड । गाई म्हैसी वच्छे तो द्वाड । पयपान तोंड आखडितो ।।१४०।। स्त्रिया करिती स्वयंपाक । थोडे अधिक दावी धाकं । दास दासीची मोडी भूक । याचका भीक घालो नेदि ।।१४१।। न खाय पूर्णता उदर । न दे तो कधी दान चार । दान पूजा नि गुरूशास्त्र । क्षीण मात्र त्या नेम नाही ।।१४२।। स्त्रिया पाजिती बाळकासी । कामास्तव वर्जी तयासी । स्तनबंध बोंडसासी । जैसे अजासी धनगर ।।१४३।। राज्य प्राप्त पूर्व पुण्यान । येथे न करी पुण्य जानोन । सदा करी पर पीडन । ते बंधन कर्मबंधन ।।१४४।। एकदा तस्य पापास्तव । मुखरोगव्याप्तदेहे सर्व । कर्मदंड लोभ्या याच भव । वैद्या द्रव्यदंड सोसिती ।।१४५।। राज्यदंडानी अग्नीचोर । दंड सोसिती पापी नर । हे जानोन तो राज्यधर । रागे जर्जर फार जाला ।।१४६।। महावैद्य महाऔषध । रोगनाशार्थात विविध । भाजन रसायन शुद्ध । करोनी सीध स्वीकारावे ॥१४७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org