________________
प्रसंग त्रेचाळीसावा : ५७१ श्रीगुरूराज दयावंत । दीक्षा दिधली विधीयुक्त । सुरमंत्र दिधला तयात । शास्त्र सिद्धान्त निपुण तो ॥१२६॥ स्वामी मजसी नेम देन । पक्ष उपास मी करीन । गुरू पाहे अवधीज्ञान । तव अष्टदिन आयुष्य ।।१२७।। ते ऐकता चिलाईत । अनशनव्रत गुरूहस्त । कायोत्सर्ग ध्यानस्वस्थ । जैसा स्तंभ अचळ तो ।।१२८।। श्रेणिकराय वैभारासी । देवदर्शन पाहे गुरूसी। नमोस्तु केला भावार्थेसी । चिलाईतासी वोळखिले ॥१२९।। तप वीर धीर देखोन । नमन केले त्या रायान । प्रशंसा केली धन्य धन्य । वंश धन्य देहे सार्थक ।।१३०।। पुनः नमोस्तु केला त्यासी । श्रेणिक गेला निजस्थानासी । सुभद्रा व्यंतरी पाहे त्यासी । पूर्व वैरासी आठवी ते ।।१३१।। रूप धरी क्रूर पक्षीण । मस्तकी बैसे फोडी नैन । अशुद्ध वाहे नेत्रातून । मक्षिका वेष्टन अंगासी ।। १३२।। डास गांधनी तोडी शरीर । परीषह दुःसह दुर्धर । पूर्वकर्म न सोडी वैर । श्रोते चतुर परिसावे ।।१३३।। दुर्धर परिषह सोशी । समाधीमरण जाल त्यासी । तपे इंद्रपद तयासी । सर्वार्थसिद्धिमी सर्वसुख ।।१३४।। काव्यः-स श्रीमान् सुभटाग्रणीर्गुणनिधिः जित्वोपसर्ग दृढं । श्रीमन्जैनपदाब्जचिंतनपरो देवेंद्रवृंदैः स्तुतः ।। संप्राप्तो निजपुण्यसंबलयुतः सर्वार्थसिद्धि शुभां । दद्यात् चारुचिलातपुत्रसुमति भव्योऽत्र मे मंगलं ॥१३५।।
चिलाईत कथा संपूर्ण ॥ कथा ७० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org