________________
५७० । आराधना कथाको
तो गेला चिलाईतापासी। द्रव्य आशा दावि त्यासी । म्हणे मातुळकन्या मजसी । बळत्कारेसी लग्न करा ॥११४।। पंचशत भिल्ल मिळोन । भर्तृमित्राख्यासी घेवोन । त्वरे राजगृही जावोन । लाविले लग्न बळत्कारे ॥११५।। चिलाईत सर्व मिळोन । सुभद्रा कन्या केले हरण । तो कोल्हाळ श्रेणिक ऐकोन । निघे त्वरेन तयापृष्टी ।।११६।। सैन्यासहित तो वेष्टिला । भिल्लाचा मेळा तो पळाला । पापी करिती ते पापाला । प्राण घेतला सुभद्रेचा ।।११७।। आर्त क्रोधध्यानी ते मरोन । व्यंतरी जाली त्याचवने। चिलाईत वैर बांधोन । वनभ्रमण करीतसे ॥११८।। राय धरिला चिलाईत । मग त्यासी केले फजीत । उत्तमकुळी जन्मप्राप्त । परपीडा तूत कुगती ।।११९।। ते ऐकोन बंधुवचन । आपनिंदा करी वंदन । धिक् धिक माझे हे जिन । कुळी लांछन लाविल म्या ।।१२०।। आता तारी बंधु सखया । शरणांगत तुझ्या पाया । राय अभय देवोनिया । याच ठाया सुखी राहिजे ।।१२१।। तत् वैभार त्या पर्वती। पंचशतमुनी असती । मुनिदत्ताख्य मुख्य जती । तपे तपती भानु जैसे ।।१२२॥ त्या गिरीवरी चिलाईत । सहज गेला चिंताग्रस्त । मुनींद्र दृष्ट्वा अकस्मात । केला नमोस्तु द्वयपाणी ।।११३।। स्वामी मी अज्ञानी पापिष्ट । माझे निवारा भवकष्ट । मज तारावे कृपादृष्ट । चरणी ललाट ठेविले ॥१२४।। स्वामी दयाब्धि अवधीज्ञानी । भव्यप्राणी जानोनी मनी । धर्म तत्त्व उपदेशोनी । दीक्षेलागुनी सिद्ध जाला ।।१२५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org