________________
प्रेसंग त्रेचाळीसावा | ५६९
1
पुण्यप्राणी गेला देशासी । मातुळ भेटला तयासी । कन्या दिधली श्रेणिकाशी । नंदा राणीशी सर्वसुख ॥ १०२ ॥ . द्राविड देश कांचनपुरी । श्रेणिक राजा सुखमंदिरी । येरीकडे राजगृहनगरी । उपश्रेणिकांतरी संतोष ||१०३ ॥ चिलाईत राजी स्थापिला । भाष शब्द सत्य जाहला । पाहता धर्म आचरिला । हृदयी आठविला श्रेणिक ||१०४ || राजमुद्रा शोभे त्यासी । देवा म्या पिटला देशासी । विरक्त होवोन मानसी । वैराग्यासी चितवीतसे ॥ १०५ ॥ मुनिसी विनय करोनी । दीक्षा विधियुक्त घेवोनी । श्रीकीर्ती महाशुद्धज्ञानी । मोक्षमार्गानी जातील ॥१०६ ॥ तेव्हा तो चिलाईतपुत्र । मूढा न कळे राज्यसूत्र । अन्याय विन वानपुत्र । पिडोन सर्वत्र द्रव्य हारी ॥ १०७॥ कित्येक दिवसानंतरे । श्रेणिका श्रृत्य समाचार | घेवोनिया तो दलभार । राजगृह नगर पातला ॥ १०८॥ चिलाईत गेला पळोनि । श्रेणिक बसला सिंहासनी । प्रजा पाळी पुत्रासमानी । जिनभुवनी नित्य पूजा ।। १०९ ।। नित्य करिती चार दान राजा रहित पुण्यवान । गुरूभक्ती शास्त्रयुक्तीन। शास्त्रश्रवण ते सिद्धान्त ।। ११० ।। चिलाईत गेला वनात | दुर्गं बोधिला बलान्वित । करभार घेत देशात । द्रव्य अगणित संचये ॥ १११ ॥
तत् समीप ग्रामांतरी । भर्तृमित्राख्य तो संसारी । त्याचा मातुळ श्रावकाचारी । राजगृह नगरी नांदत ।। ११२ ।।
रुद्रदत्त नामाभिधान । तत् कन्या सुभद्रा सगुण । ते मागे भर्तृमित्र आपन न देत म्हणे मिथ्यातिसी ।। ११३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org