________________
प्रसंग त्रेचाळीसावा : ५७३ तत् समयी पूर्वपुण्येन । तपकीर्ती मुनी धीमान् । बावीस परीषह ध्यान । तरणतारण त्रैलोकी ।।१४८।। नौंवा सोळाकारण । भावरी आले राजसदन । त्या नृप पाहोनी नयन । दर्शनेन पुण्य उद्भव ।।१४९।। मुनीचा माझा रोग एक । राज जानोनिया निःशंक । कळस घेवोनी हस्तक । भुनीनायक पडघावी ।।१५०।। दिव्य औषध आहारात । तुर्यदानेन मुनी तृप्त । नवविधा पुण्य प्राप्त । रोगरहित गुरूराय ।।१५१।। क्षुधारोग वपुचा रोग । मुनींद्र जाले दिव्य अंग । जैसे मिथ्यामत भंग । सत्यार्थमार्ग उपदेशे ॥१५२॥ नृपही जाला आरोग्यता । पुण्यप्रतापे आयुपूर्ता। अंती भरत क्षेत्रातौता । पुण्यवंता पुण्यमंदीर ॥१५३।। आमलकटाख्ये नगरी । अनिष्टसेन तो राज्य करी । नंदीमती राज्ञी सुंदरी । तत् उदरी अशोकराजा ।।१५४।। पुत्र जन्मला रूपवंत । नाम ठेविले धान्यवंत । माता पिता संतोषवित । पुण्ये मंडित सकुमाळ ।।१५५।। द्वितीयचंद्र पौर्णमेसी । वृधी पाविला तारुण्यासी । सर्वकळा गुणरासी । सिद्धान्तासी श्रुतज्ञानी पै ॥१५६।। एकदा वसंत ऋतु दिन । अरिष्टनेमी नाथ जिन । विहार पुष्प बागवन । समवशरण बारसभा ।।१५७।। ते पाहोनिया वनमाळी । षड्ऋतु पुष्प फळी । आला घेवोन रायाजवळी । पुण्यबळी राया तुमचे ।।१५८।। ऐकोन दिल्ही आनंदभेरी । वंदने चाले सहपरिवारी । जावोनिया तो वनांतरी । जैजैकारी वचने वदे ॥१५९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org