________________
प्रसंग त्रैचाळीसावा : ५६५ सर्व वीर मेळा मिळोनी । व्याघ्र वेष्टिला त्यानी वनी । कित्येक भयाभीत मनी । वीरश्रेणी शूरत्व वीर ॥५६॥ महाकोल्हाळ किंकळया वीर । दरी खोरीत गुप्त व्याघ्र । राजा धीट होवोनी मोर । दडाला व्याघ्र गुंफे आत ।।५७॥ राय कष्ट मेळवोनिया । गुंफा संपूर्ण भरोनिया । अग्नी प्रदीप्त केला तया । व्याघ्र आरोळ्या देत असे ॥५८।। महाकष्टेन व्याघ्र मृत्य । क्रोधे वैरबंध अत्यंत । चंद्रपुरी तेथेच तेथे । विप्रभरत जन्म व्याघ्रा ।।५९।। भरताची स्त्री विश्वदेवी । पुत्र कपिला नाम ठेवी । दीर्घ होता क्रूर हृदयी । पूर्वीची ठेवी कर्मानुसार ॥६॥ श्रीदत्त स्वस्थळा जावोन । भोग भोगी पूर्वीचे पुण्य । अभयमती पुत्रोत्पन्न । नामाभिधान सुवर्णभद्र ॥६१।। रूपे सौभाग्यमंडित । विवाहक्रिया यथास्थित । ततो राजा देवगुरूदत्त । जाला विरक्त संसारी ॥६२।। पुत्रासी राजी स्थापोनिया । गुरूसन्निध जावोनिया। महाविनय करोनिया । दीक्षाजाया ते परनिली ॥६३॥ जिनागम अभ्यास करी । गुरू आज्ञा एकलविहारी । भव्यजीवा उपदेश करी । चंद्रपुरी गमन त्यासी ॥६४॥ कपिला ब्राह्मण शेतात । कायोत्सर्गी मुनी ध्यानस्थ । पक्ष उपवास नेमस्त । काया पर्वत अचळ पै ॥६५॥ तदा पूर्वकर्म योगेन । दुष्ट कुबुधी तो ब्राह्मण । स्त्रियेसी सांगे मे भोजन । शेतास घेवोन येई गे ॥६६॥ पाकनिष्पत्ती ते सारोन । गोदुग्ध दशमी घेवोन । त्वरे आली ब्राह्मणी सगुण । जेथे तो ब्राह्मण दिसे ना ॥६७॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org