________________
५६६ : माराधना कथाकोष
भट्टारकासी पुसे स्त्रिया । ध्यान मौन मुनिवर्या । ब्राह्मणी गेली फिरोनिया । मुनीरायासी न पश्यंती ॥६८॥ ब्राह्मण आला स्वामिपासी । पुसता जाहला स्वामिसी । मौन देखोनिया तयासी । गेला गृहासी क्षुधाक्रान्त ॥६९॥ क्रोधे बोले अनित्यवचन । अगे गे रंडे घेसी प्राण । शेता न आनिले भोजन । क्षुधातृषेण पीडले गे ॥७॥ नग्न मुनी होता तो तेथ । का गे नाही पुसिल त्यात । ऐकोनी कांतवचनात । भीताभीत बोले धवासी ॥७॥ स्वामी म्या पुसले स्वामिसी । तेथ होत मुनी मौनेसी। मग मी आले स्वगृहासी । क्रोध कोन्हासी न करावा ॥७२॥ तदा तो कपिला ब्राह्मण । क्रोधे जावोनिया वने । मुनीपासी काष्ठे रचोन । कापूस गुंडून सेवरीचा ॥७३॥ अग्नि चेतवी पापी नर । तो शुक्लध्यानी मुनीश्वर । घातिकर्माचा संहार । परीषह थोर सोशी तुझे ।।७४॥ शुक्लध्यान ज्ञान केवळ । प्राप्त होता मुनी दयाळ । विमानारूढ सूर सकळ । पूजा केवळ पुष्पवृष्टी ॥७५।। कपिला ब्राह्मणासी आश्चर्य । म्हने धन्य हे मुनीराय । हृदयी भ्याला पापभय । नमस्कारी पाय स्वामीचे ॥७६॥ श्रुतकेवळी ज्ञानेश्वर । पूजू आले ते सुरनर । उपदेश ऐकोनी समग्र । वैराग्य अंतरी ब्राह्मणाचे ॥७७॥ अपनिंदा करोनी तया । पुनः पुनः लागतु पाया। स्वामी कृपा करोनिया । मम पापिया दीक्षा द्यावी ॥७८॥ महामिथ्याती तो ब्राह्मण । मुनीराय केला पावन । शरणांगतासी तारण । केले पावन ब्राह्मणासी ॥७९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org