________________
५६४ । आराधना-कथाकोष श्लोक: नत्वा पंचगुरून् भक्त्या, प्रोल्लसत् केवलश्रियं । गुरूदत्तमुनेर्वच्मि चरित्रं भुवनोत्तमं ।।४४।। हस्तनागपुर सुंदर । जैनधर्मी सर्वे नर । विजयदत्ताख्य राजा धीर । विजया सुंदर प्राणप्रिया ।।४५।। तयाचा पुत्र रूपवंत । नामाभिधान गुरूदत्त । पूर्वपुण्येन यथास्थित । सुख भोगीत मन ईच्छा ।।४६॥ पुत्र पाहोन राजियासी । वैराग्य उद्भव मानसी । राज्यी स्थापोनी पुत्रासी । दीक्षा गुरुपासी घेतली ॥४७।। तीव्र तपश्चर्या करीत । दिगंबर वनी राहत । ग्रामी पुत्र राज्य करीत । इच्छा मनात विवाहाची ॥४८॥ लाट देश विख्यात असे । द्रोनी पर्वत विशाळ दिसे । त्यातळी ग्राम विषय । चंद्रपूर भासे अमरत्व ॥४९॥ तेथचा राजा चंद्र कीर्ती । स्त्रीचंद्र रेखा राज्ञी सती । तत् कन्या अभयमती । रूपवंती चंद्रवदनी ॥५०॥ ते मागे राजा गुरूदत्त । न दे चंद्रकीर्ती तयात । . शीघ्रकोपी घेवोनी सैन्यात । चंद्रपुरीत वेढीले ॥५१॥ ते ऐकोनी अभयमती । तीर्थरूपा करी विनती। बापा न करी वैरस्थिती । नृप सम्यक्त्वी मज त्या देई ॥५२॥ तेव्हा त्यासी चंद्रकीर्तीने । कन्या दिधली महोत्सवान । श्रीगुरूदत्त बळवान । संतोष मन रायराणी ॥५३॥ त्या ग्रामासमीप पर्वत । द्रोणाचळ असे विख्यात । तेथे व्याघ्र भयरहित । भयभीत ग्राम वस जाले ॥५४॥ जितावे त्या व्याघ्रासी तुमी । ऐकोनिया हृदयधामी । त्याचा संव्हार करीन मी । स्वस्थ तुम्ही असावे मामा ॥५५॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org
Jain Education International