________________
प्रसंग बेचाळीसावा । ५५९
पंचमुद्रा हृदयी धरी । ईर्यापथ शोधन करी । प्रचंडराय पाहे नेत्री । दिगंबरी हा मम पिता ॥ ८९ ॥ हेमकळस तोयपूर्णं । तिष्ठ तिष्ठ वदे वचन । विपरीत्य करी नमन । पदप्रक्षाळन पाणि पानी ॥९०॥ कर शुद्धी सिद्धभक्ती । षड्रस पक्वान्न तृप्ती । नवविधा पुण्य जोडिती । नमोस्तु करिती सर्वही ॥ ९१ ॥ अभयघोष मुनीराय | चंडपुत्र त्यासी पाह । क्रोध उत्पन्न त्या हृदय । दात खाय जातिस्मरन ॥ ९२ ॥ कासव जन्माचे उसन । वैरियासी मी दंड करीन । करी शस्त्र त्यान घेवोन । पाहिला नैन दिगंबर ||१३|| वनी मुनी तपश्चर्या । मेरुवत् अचलकाया । सव्य भुज ते छेदोनिया । दुःखहृदया मुनी सोसी ॥ ९४ ॥ वामभागी येवोनी त्वरित । भुजा छेदि स्वर्गाचे हस्त । परीषह सोशी ध्यानस्थ । त्रिगुप्तागुप्त सांभाळीतो ॥९५॥ वैरी करी पदछेदन । तत् उत्पन्न केवळज्ञान । लौकांतिक देव येवोन । करिती पूजन केवळीचे ।। ९६ ।। अहो जीवाची शक्ती थोर । कोठे नरक मोक्षघर । तपबळे धरोनी धीर । मोक्ष नार पाचवी गती ||१६|| श्लोक:- जित्वा शेषपरीषहान् दृढतरान् हत्वा च मोहादिकं । नानाजन्मशतोरुकष्टजनकान् क्षित्वाशु कर्मादिकान् ॥ संप्राप्तो क्षयमोक्षसौख्यमतुलं स श्रीजिनः शं क्रियात् । संपूज्योऽभयघोषनामकलितो नित्यं सतां सेवितः ।। ९८ ।।
इति कथाकोश कथा ६५-६६ - ६७ अभयघोष मुनीकथा श्रीरत्नकीर्तीशीषविरचिते प्रसंग ४२ संपूर्ण छ ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org