________________
५५८ । आराधना- कथाकोष
एकदा अभय रायान । पाहिले चंद्राचे ग्रहण | विधा वैराग्य त्या उत्पन्न । चितवी मन अनुप्रेक्षा ।।७७ || अहो पापी मी मिथ्यामती । नाही केली म्या गुरुभक्ती । देवपूजा सिद्धांत श्रुती । पुण्योत्पत्ती न कळे मज ॥ ७८ ॥ हिताहित न समजले । अळस मूढ पाप जाले । कुधर्मासी चित्त रमले नाही केले म्या दानपुण्य ॥ ७९ ॥ कैसा तरेन या संसारी । पाप पंडित मोहांधारी । दीक्षा घेवोन पाप संहारी । अष्टकर्मवैरी जितीन ॥८०॥ तप तीव्र महाघोरादरं । भाषितं श्रीजिनवगतं । पूर्वाचार्य सन्मार्ग सूत्रं । कर्मशत्रु जिती महारिपु ॥ ८१ ॥ मुक्तिकांता तप बळेन । सर्व सुख मी पाहिन नैन । अनेक प्रकार विचारी मन | करीन यत्न चतुराई ॥८२॥ राज्य दिल्हे चंडपुत्रासी । दीक्षा घेतली पापनाशी । पंचांग नमन गुरूसी । मुनिक्रियासी अवलोकित ॥८३॥ पंचेंद्रिया करी दमन । पंचपर्वनी उपोषण । अष्टकर्म करी खंडन । क्षयकारण सर्व पाप ||८४ | | गुरूसी नुती करोनिया । स्वामी कृपा संपादोनिया | एकट बिहारी होवोनिया । तपश्चर्या मासोपवासी ।। ८५ ।। धर्मोपदेश जनाकरी । तो आला काकिंदी नगरी । तप तीव्र वनांतरी । शीळेवरी आतापयोग ॥ ८६ ॥ जन्मभूमी तोचि ठिकान । तेथे पूर्ववैरी येवोन । प्रचंड पुत्रापुत्र होऊन । कूर्म आवतरोन वैर साधी ॥ ८७ ॥ नवैर हा त्या तिन्ही । जीव भोगि दुःखाची खानी । मासोपवासी अभयमुनी | ग्राम लक्षोनी चालले ॥८८॥
|
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org