________________
प्रसंग त्रेचाळिसावा ॥ श्री पंचपरमगुरुभ्यो नमः ॥
श्लोक : - सर्व सौख्यप्रदं नत्वा जिनेंद्रं भुवनोत्तमं । वक्षे विद्युत्चराख्यानं विख्यातं मुनिभाषितं ॥१॥ मिथिलाख्यपुरीचा राजा । वामरथ पाळि तो प्रजा । देवगुरूशास्त्रवोजा । पुण्यध्वजा जिनमंदिरे ॥२॥ तेथे यमदंड तराळ | विद्युत् चोर महाविशाळ । चोरी करी महाकुशळ । असे सकळ दिनरात्री ||३|| दिवसा दिसे अनाथदीन । रात्रौ दिव्यस्वरूप धरोन | माया विद्या जपे मोहन । धनहारन करी बहु ||४|| एकदा त्या भूपमंदिरी । रात्रौपष्ट तो चोरी करी । दिवसा कुश्चळरूप धरी । कुदेवमंदिरी वसवस्ती || ५ || राव पाचारी तराळासी । दिव्यरूप चोर आम्हासी । मोहनी घालोनी रत्नरासी । अपार धनासी हारिले ||६|| यमदंडाते दे आनोन । नानिता तूते दंड देईन । सप्त दिन केले प्रमाण । आणीन सोधून चोरासी ॥७॥ रायासी करोनी नमस्कार | ग्राम धुंडीता सतोसार । सहा दिवसानंतर देखिला नजर वसवस्ती ||८||
I
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org