________________
प्रसंग बैचाळीसावा । ५५५
ततः कार्तिक प्रौढ जाला । चौदा वर्ष यौवनपदाला । सहज क्रीडा करीत आला । पिता पाहला विषयांध ।।४३।। हे मात ऐक वचन । पिता नये सभेलागुन । सदा तो कामक्रीडामग्न । देहाचे भान त्यास नाही ॥४४॥ हे कसे काय सांग माते । ऐकोनिया नीतीची मात । कृतिका नेत्री अश्रुपात । पापी वृत्तांत न सांगवे ॥४५।। पुत्र म्हणे सांगावे बाई । ते वर्तमान कैसे काई । विपरीतार्थ ऐके हृदयी । म्हणे हे बाई बरे नोव्हे ॥४६।। कार्तिक म्हणे वो मातोश्री। निषिद्धिला नाही राजेश्री । विद्वान् अथवा स्वामिश्री । शास्त्रादिक श्रीदेवगुरू ॥४७॥ माता वदे वो पुत्र राया । बुद्धिवंत वजिल तया । स्वामी सांगताची तया । पीटी स्वामिया देशावर ॥४८।। ते मुनी कशा परी बाळ । जानती सारासार कळा । सप्ततत्त्वाचा जिव्हाळा । ज्ञानरसाळा दिगंबर ॥४९॥ ते धर्मनायक निग्रंथ । मयूरपिच्छी दया अर्थ । शौच्यासाठी कुमंडलहस्त । जगन्नाथ तो जगद्गुरू ।।५।। जननी वचन ऐकोनी । त्रिधा वैराग्य उद्भव मनी । गृहत्याग धिक्कार करोनी । गेला वनी श्रीगुरूपासी ।।५१।। नमोस्तु केला त्रिशुद्धीन । दीक्षा मागे सुखसंपन्न । मुनीराज कृपा करोन । दीक्षाकल्याण विधीयुक्त ॥५२।। मनिक्रिया पढे समस्त । सप्त तत्त्व नव पदार्थ । दसलक्षण धर्म सिद्धान्त । सर्व ग्रंथ पढीक्कमामि ।।५३।। तत् माता ते कृत्तिका भली । आर्तध्यान मृत्यु पावली । व्यंतर देवता जन्मली । दिव्य चांगली रूपवंता ।।५४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org