________________
५५६ । आराधना-कथाकोष कार्तिक मुनी दिगंबर । तीर्थयात्रा करी विहार । पातला रोहेड नगर । तपः तीव्र जेष्ठ मासात ॥५५।। अमावास्या दिनी भावरी । करू पातले त्या नगरी । बहीण वीरमती सुंदरी । उपरी वरी उभी होती ।।५६।। तिन देखिला मुनीराय । म्हणे हा माझा बंधु होय । भ्रतारा सोडोनी लवलाहे । सन्मुख जाय श्रीगुरूचे ।।५७।। तुभ्यं नमोस्तु द्वैपद्म मूर्ती । त्रिविध पंचांगे नमोनी । बंधु मुनीराय सद्गुणी । अंतःकरणी किं न प्रीती ।।५८।। तदा तो क्रौंच नृप पापी । स्त्रीमुनी पाहोनिया कोपी। महाक्रोधे तो नष्टरूपी । शांतस्वरूपी मुनि विधिला ।।५९।। हाहाक्कार जाला ते समयी । भव्य श्रावक लवलाहि । राजभय त्याचे हृदयी । न चले बळ काई तयाचे ।।६।। पापी मिथ्यामती जे प्राणी । गुरू धर्म न रुचे मनी । कुबुधी हिंसक दुर्योनि । दुःखाच्या खानी भोगिताती ॥६१।। तदा ते शीघ्र धाविनली । व्यंतरी देवी मुनी माउली । जातिस्मरणात पावली । झेप घाली बालकावरी ।।६२।। मयूररूप धरोनीया । सीतळनाथ चैत्यालया। स्वामीसी तेथे नेवोनीया । ठेविले तया वसईत ।।६३।। तेव्हा तो कार्तिक स्वामी मुनी । दीर्घ परीषह साहोनी । मुंडकेवळी तो निर्वाणी । स्वर्गभुवनी सर्वार्थ त्या ।।६४।। लौकांतिक देव आले । भुक्ती युक्ती पाद पूजिले । स्वामी कार्तिक पूज्य जाले । तीर्थ स्थापिले विख्यात जगी ।।६५।। माता वीरमती व्यंतरी । द्वितीय कृत्तिका सुंदरी । राजा आदि पश्चात्ताप करी । वदना करिती तीर्थभावी ।।६६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org