________________
५५४ : आराधना कथाकोब
श्लोक : केवळज्ञानसत्रेत्रं पवित्रं शर्मकारणं । नत्वा जिनं प्रवक्षामि कार्तिकेयकथानकं ॥ ३१ ॥ कार्तिकाख्ये नगरी राजा । अग्निभूति तो पाळि प्रजा । राणी वीरमती ते भाजा । गृहकाजा ते षड्गुणी ||३२|| तत् पुत्त्री कृतिका सुंदर । अष्टमी व्रत नंदीश्वर । पूजा करिती परिवार । षोडश प्रहर उपवास ||३३|| पारणे करोन यथास्थित । पिता पाहे स्वकन्येत । कुबुधी उद्भव मनात विषयासक्त महान् ज्ञाते ||३४||
राजा विचार करी मन । मम गृही हे कन्यारन्त । न करीन मी परस्वाधीन । स्वगृही राहण सुंदरी गे ॥ ३५ ॥ माता कन्या त्या दोघीजनी । दर्शना गेल्या जिनसदनी । स्वामिसी वृत्तान्त सांगोनी । रायासी मुनी पाचारी ॥ ३६ ॥ राया ऐकावे मम वचन । कन्याभिलाष न करन । कष्ट कोटी दुःखदारुण । जगनिंदन इहलोकी ||३७|| गुरुवाक्य ऐकोनिया । क्रोध उत्पन्न राजिया | काय कारण हे बोलाया । येथोनिया तू जाय वेगी ||३८|| क्रोधे साधूसी पिटाविले । कृतिका कन्येसी परनिले । पापी कामांध भ्रष्ट जाले । दुर्गती गेले आनी जातील ||३९|| धर्मनेन लज्जाही नाही । गुरूनेन उपाध्या तोही । नेन सारासार पापही । उन्मत्तदेही मदनमस्त ॥ ४० ॥ तत् विषय भोग भोगिता । पुत्रोत्पन्न एकसुता । कात्तिक पुत्र महाज्ञाता । विरमति सुता सुंदरागी ॥ ४१ ॥ रोहेडनगरी कौंचराव । कन्येचा केला तो विवाह । भोग भोगती अपूर्व । पूजिती देव वीतराग ॥४२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org