________________
प्रसंग बैचाळीसावा । ५५३ होवोन एकलविहारी । तो आला कौशांबी नगरी । आताप योग शिळेवरी । पर्वत शिखाग्री तिष्ठला ।।२०।। जेष्ठ मास तप दारुण । शिळा तप्त उष्णेकरोन । भव्य जीवानी ते पाहोन । करिति नमना त्रिशुद्धी ।।२१।। एके दिवसी मुनीराय । भावरीस्तव मुद्राहृदय । औट हस्त पाहोनी मोप । ते गुरूराय दिगंबर ।।२२।। तदा ते दुष्ट बौधमती । ते गेले पर्वतावरौती । अग्निकाष्ठ ते चेतवीति । शिळा तपती ते ताम्रवर्ण ॥२३॥ पापिसी साधू देखवेना । धुकासी हेळि आवडेना। तेवि तपसी देखवेना । करिती छळना पापिष्ट ।।२४।। भ्रामरी करोनी त्वरित । पर्वत चढले साधुसंत । शिळा देखिली अग्नितप्त । प्रतिज्ञा करीत तपस्वी ॥२५।। स्वामी साधु वृषभसेन । पंचाग्नी करिती साधन । बाह्याकारि तीन कृशान । आंतरी दोन साधिती साधू ।।२६॥ करोनी सकळ संन्यास । धीर वीर साधि परीषह । शिळे बसताचि सुरेश । सिंहासनास निर्मापिले ॥२७॥ केवळज्ञान उत्पन्न जाले । त्रैलोकीचे देव आले । निर्वाणपदासी ते गेले । चारित्र निश्चल तपस्वी ते ॥२८।। श्रोते व्हावे सावधान । तप भावना करा श्रवन । अक्षरपदस्वरहीन । घ्या सांभाळोन दयाभावे ॥२९॥ श्लोकः-यच्चितोन्नतपर्वतस्य पुरतः प्रोत्तुंगभूभृत् गणे । ऽणुत्वं याति सरित्यति सुनितरां दर्भानबिंदुपमां ।। स श्रीमान् वृषभादिसेन जिनपः प्रध्वस्तकर्मा विभू । दद्यात् स्वस्थगुणश्रियं गुणनिधि, सर्वसिद्धिप्रदं ॥३०॥
कथा ६५
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org