________________
५५२ । आराधना-कथाकोष
आदर उपचार पाहोन । सुख संतोष रायमन । जै उष्णकाळी शीतप्राशन । वृक्ष उत्पन्न फळप्राप्ती ।।८।। कन्यादान श्रावकमनी । नृप अंगिकार करोनी । लग्न उछाव पंचदिनी । आनंद मनी उभयताचे ।।९।। पट्टराणी पद दिधले । जिनदत्ता गुणउज्जले । पूर्व पुण्य भोग भोगिले । मग्न जाले सुखसंसारी ।।१०।। एके दिनी पश्चिम रयणी। स्वप्नी पाहे वृषभ गुणी । राय ऐकोनी तोश मनी । नौ मास कामिनी संपूर्ण ॥११।। पुत्र प्रसवली सद्गुण । नाम ठेवी वृषभसेन। जिनमंदीरी पूजादान । पुण्य न पुण्य जोडिताती ॥१२।। वासरमास प्रौढ जाला । अष्टवरुष ज्ञाता भला । राजा प्रद्योत संतोषला । संसारी जाला विरक्त ।।१३।। बोलाविले प्रिय पुत्रासी । बापा सांभाळी या राज्यासी । आम्ही जावोनी गुरूपासी । दीक्षा तपासी करू पुना ॥१४।। पुन म्हणे वो तीर्थरूपा । राज्य करावे स्वस्थ भूपा । येथेच पहा सिद्धकृपा । करावे तपा गृहधर्म ।।१५॥ नृपति वदे चिरंजीवा । प्रपंची नोव्हे बा विसावा । जैनदीक्षा तपभावा । विना ठावा बा मोक्ष कैचा ।।१६।। राज्यभार दुःखकारण । वचन पुत्रान ऐकोन । तयासी वैराग्य तत्क्षण । दुःखाची खान नका ताता ।।१७।। पुत्रा पाहोनी सम्यक्त्वी। बंधु सुत बोलावी प्रीती। राज्य देवोन यथायुक्ती । गुरूप्रति विनयपाणी ।।१८।। दीक्षा बृषभसेन मुनी । तपः कुर्वति जिनवाणी । सर्वक्रिया सिद्धान्तगुणी । भव्यजनी उपदेशक ।।१९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org